Skip to main content

पहिली वाफ


कौरव आणि पांडव यांच्या मधलं युद्ध संपलं होतं. 
दुर्योधन म्हणजेच धृतराष्ट्र याचा ज्येष्ठ पुत्र. भीमाने त्याचा पाडाव केला, त्याला मारलं आणि कौरवांवर विजय मिळवला.
धृतराष्ट्र या बातमीने हळहळला. त्याने भीमाला भेटायची इच्छा व्यक्त केली. भीम सामोरा गेला.
धृतराष्ट्र बघू शकत नसे. तो अंध होता. मात्र हे जाणून होता की भीमाने आपल्या मुलाला मारलंय. दुःख व्यक्त करण्याचा बहाणा करत त्याने भीमाला जवळ बोलावलं आणि आलिंगन दिलं. इतकी जोरात त्याने मिठी मारली आणि आपल्या मुलाला मारल्याचा राग त्याने भीमावर काढला. जवळ जवळ भीम मोडला असं त्याला जाणवलं आणि त्याने मिठी सोडली आणि आक्रोश केला की हे मी काय केलं मी तर भीमाला मारलं.

त्याचे खोटे अश्रू पाहून मात्र कृष्णाने थोडी मध्यस्थी केली. कृष्णाने जाणूनबुजून भीमाला पाठवायच्या ऐवजी भीमाचा त्याच्याच आकाराचा पुतळा समोर उभा केला होता. धृतराष्ट्र बघू शकत नव्हता. त्याने पुतळ्याला घट्ट मिठी मारून त्याचा चुराडा केला होता.

भीम वाचला. कृष्ण म्हणाला, घाबरु नका. आता भीमाला भेटा. तो गेला नाही.. जीवंत आहे.


कृष्णाने खूप सोपी गोष्ट केली होती. रागाची भावना नष्ट होऊ देण्यासाठी तो पुतळा समोर नेला होता. पहिली वाफ जाऊ दिली होती. मग नंतर रागाच्या भावनेची तीव्रता कमी झाल्यावर भीमाला समोर केलं होतं.

अनेक असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तिथे त्याला थांबवता येत नाही. थांबवू सुद्धा नाही आणि उलट सुद्धा बोलू नाही. फक्त बोलू द्यावं. एकदा का पहिली वाफ गेली की मग आपले मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडता येतात... मग त्याचीही मनस्थिती आपलं ऐकून घेण्याची झालेली असते.

"ठंडा कर के खाओ।"

म्हणजे आपलंच तोंड भाजत नाही.


- वरुण भागवत
- वेळ: थंड करून खाण्याची!

Comments

  1. सहज सोप्या शब्दांत अंतर्मुख होत विचार करायला लावणाऱ्या ओघवत्या भाषेत लिहिलंय ���� अप्रतिम ����

    ReplyDelete
  2. सहज सोप्या शब्दांत अंतर्मुख होत विचार करायला लावणाऱ्या ओघवत्या भाषेत लिहिलंय.. अप्रतिम...

    ReplyDelete
  3. Khup Chan sir

    अनेक असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तिथे त्याला थांबवता येत नाही. थांबवू सुद्धा नाही आणि उलट सुद्धा बोलू नाही. फक्त बोलू द्यावं. एकदा का पहिली वाफ गेली की मग आपले मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडता येतात... मग त्याचीही मनस्थिती आपलं ऐकून घेण्याची झालेली असते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...