Skip to main content

कर्माचं Circle

A Click by- Sushil Ladkat

एक होता उंदीर आणि एक होता बेडूक. यांची झाली मैत्री. थोडं odd होतं हे combination. उंदीर बिचारा भोळा आणि बेडूक थोडा लबाड.

हा बेडूक उंदराशी वाट्टेल तसं विचित्र वागायचा आणि त्याचं त्या बेडकाला कधीच काही वाटायचं नाही. त्याला तो कायम कमी लेखायचा. उंदीर त्याचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची त्याला खात्री होती आणि हे बऱ्यापैकी खरं सुद्धा होतं. उंदीर कधीच काही बोलायचा नाही. असली मैत्री तरी का असावी असा एक प्रश्न कोणालाही पडला असता. पण ज्याला पडायला पाहिजे त्या उंदराला तो पडत नव्हता. पर्याय नसल्यासारखं, जगातले इतर मित्र संपल्यासारखा तो घाबरून का होईना त्याच्यासोबत राहत होता. त्यामुळे बेडकाचं असं बेदरकार वागणं वाढू लागलं.

एक दिवस तर बेडकाने कहर केला.
त्याला उंदराची अतीशय नीच दर्जाची मस्करी करायची लहर आली. त्याने उंदराचा पाय स्वतःच्या पायाला बांधला आणि उड्या मारत फेरफटका मारायला निघाला. उंदीर फरफटत त्याच्या सोबत ओढला जाऊ लागला. डबकं तर बेडकाची अतीशय लाडकी जागा. त्याने उंदराचा आणि बाकी कसलाच पुढचा मागचा विचार न करता डबक्यात उडी टाकली. स्वतः मस्तपैकी पाण्यात खेळू लागला. पण उंदराच्या मात्र नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. इतकं की तो गटांगळ्या खाऊ लागला आणि काही क्षणांत मरण पावला. बेडकाला त्याचं काही नव्हतं.

जगात चांगली माणसं आहेत पण सोबत नीच माणसं सुद्धा असतात. स्वतःच्या फायद्यासाठी, गमतीसाठी एखाद्या साध्या माणसाला चेष्टेचा विषय बनवतात. स्वतः डबक्यात राहतात आणि दुसऱ्याला पण त्याच त्या डबक्यात ओढतात. मग त्यात त्या दुसऱ्याचं काय होतंय या कडे ते पाहत नाहीत. अनेक जण भीतीने अशा लोकांच्या मागे जातात. काय म्हणतील ते सहन करतात. अनेकदा कळत पण नाही.

अन्याय करणं चूक तसं सहन करणं सुद्धा चूक!

पण अन्याय करणं तर कधी कधी गुन्हा करण्याइतकं गंभीर असतं जे बेडकाने केलं होतं.
उंदीर पाण्यात मेला.त्यामुळे त्याचं प्रेत फुगून पाण्यावर तरंगू लागलं. आकाशामध्ये एक घार घिरट्या घालत होती. घारीची नजर तीक्ष्ण असते. तिला वरूनच दिसलं की एक उंदीर मेला आहे आणि पाण्यात तरंगतो आहे. घार वेगाने खाली आली आणि तिने उंदीर पकडला. उंदराचा पाय अजूनही बेडकाला बांधला असल्याने घारीने उंदीर पकडल्यावर त्याच्या सोबत आपोआपच गाफील असलेला बेडूक सुद्धा तिच्या तावडीत सापडला. घारीला आयती शिकार चालून आली होती. तिने समोर आलेल्या मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेतला.

Karma (अर्थात कर्म) ही अशी गोष्ट आहे जी फिरून आपल्याकडेच येते.

चांगल्या कर्माचं फलित उत्तम मिळतं. वेळ लागू शकतो. मान्य.. पण वाईट कामाचं फळ सुद्धा वाईटच. कधीकधी त्याचं फळ तर अजून लवकर मिळतं जसं या गोष्टीत घडलं.

हे कर्म म्हणजे अनेकदा हिशोबासारखं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधीच चांगलं होत नाही.
Equation अर्थात समीकरण कधी ना कधी जुळून येतच. Circle पूर्ण होतो. बाकी शून्य राहतेच..


या गोष्टीतल्या वाईट कर्माची जशी बाकी शून्य राहिली. कारण कर्म हे boomerang नावाच्या अस्त्रासारखं आहे. वळून पुन्हा आपल्याकडेच. आपण करू तसं. आपण जे देऊ ते फिरून येतं. चांगलं केलं तर चांगलं नाहीतर....

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...