Skip to main content

कृतज्ञता म्हणजे?

A click by: Varun Bhagwat

दवाखान्यामध्ये लोक नंबर लावून थांबले होते. एक आई आणि तिचा साधारण ८ वर्षांचा मुलगा त्या मुलाच्या आजोबांची औषधं घेण्यासाठी डॉक्टरांकडे आले होते. डॉक्टर अजून यायचे होते. त्या मुलाच्या हाती एक मासिक लागलं आणि तो त्यातली चित्र चाळत होता. त्याने मध्येच काही वाचायचा प्रयत्न केला असावा आणि तो म्हणाला, “आई कु-रु-त-ज्ञ-ता म्हणजे?” आईने तो शब्द पाहिला आणि हसत म्हणाली, “कु-रु-त-ज्ञ-ता नाही रे. कृतज्ञता!” “पण म्हणजे काय?” मुलगा उत्सुकतेने म्हणाला.

आई विचारपूर्वक म्हणाली, “कसं सांगू बरं तुला? ऐक हं. पूर्वीच्या काळी काही जणांना गुलाम म्हणून वागवलं जायचं. हवी ती आणि वाट्टेल तशी कामं करवून घेण्यासाठी. एकदा एक गुलाम त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटून पळाला. पळता पळता जंगलात पोचला. तिथेच संध्याकाळ झाली. जंगलात रात्री कडाक्याची थंडी पडणार हे तो जाणून होता. म्हणून त्याने विश्रांती आणि उबेसाठी एक आसरा शोधला.

त्याला कळलंच नाही की आसऱ्याची जागा ही एका सिंहाची गुहा आहे. त्याच्या मागोमाग सिंह आलेला पाहून तो घाबरला. सिंह मात्र विव्हळत होता. त्याचा पंजा रक्तबंबाळ झाला होता. गुलाम शांतपणे त्याच्या जवळ गेला. पाहिलं तर सिंहाच्या पायात काटा घुसला होता. गुलामाने अलगद पणे तो काटा काढला. स्वत:च्या रुमालाचा उपयोग पट्टीसारखा करून जखमेवर पट्टी बांधली. सिंहाने गुलामाला कोणतीच इजा पोहोचवली नाही.” मुलाची उत्सुकता वाढली.

आई पुढे म्हणाली, “पण या गुलामाचा शोध घ्यायला मालकाने माणसं पाठवली. ती माणसं त्याचा शोध घेता घेता जंगलात पोचली. गुलाम पकडला गेला. त्याला मालकासमोर आणलं. मालक भयंकर चिडला होता. दुसऱ्या कोणी असं पळून जाण्याची हिम्मत करू नये म्हणून त्याने गुलामाला मोठ्या मैदानाच्या मध्यात सोडलं. याच्या अंगावर हिंस्त्र श्वापद सोडा अशी आज्ञा केली. पिंजऱ्यातून एक प्राणी सुटला आणि धावत गुलामाकडे येऊ लागला.

समोरून येणारं हिंस्त्र श्वापद पाहून गुलाम जागीच थिजल्यासारखा थांबला. त्या प्राण्याने गुलामाला तोंडात पकडलं आणि मैदान सोडून जे धावत सुटला ते थेट जंगलाच्या दिशेने... गुलामाला समजत नव्हतं. सुरक्षित अंतर पार केल्यावर तो प्राणी थांबला. गुलामाने नीट पाहिलं. हा तर तोच सिंह होता ज्याची मलमपट्टी गुलामाने केली होती. गुलाम पकडला गेला त्याच वेळी या सिंहाला सुद्धा पकडलं होतं. आता याच सिंहाने गुलामाला वाचवत कृतज्ञता व्यक्त केली होती.”

तेवढ्यात एक माणूस दवाखान्याच्या रिसेप्शन पाशी आला. त्याने विचारलं, “डॉक्टर आले नाहीत का?”

“येतील ना... तुमचा नंबर लावू का?” रिसेप्शन वरील व्यक्तीने विचारलं.

“नको. मला काही झालं नाहीये. मला त्यांना फक्त हा पुष्पगुच्छ द्यायचाय. मागच्या वर्षी याच दिवशी त्यांनी माझं ऑपरेशन करून मला मरणाच्या दारातून वाचवलं होतं.” तो माणूस म्हणाला.

मुलगा त्या माणसाकडे बोट दाखवत आईला म्हणाला, “आई... कृतज्ञता!”  आई प्रसन्न हसली.


वरुण भागवत      



Comments

  1. Kya baat hai! Khupch sundar! 👌👌👍👍👍

    ReplyDelete
  2. गोष्ट छानच आहे, फक्त यामध्ये नंतर तात्पर्य/सारांश असे काही नाही, तेव्हढच खटकलं. ते छान मांडलेलं असतं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...