| A click by - Varun Bhagwat |
एक होता राजा
त्याची खुशीत होती प्रजा!
दरबारी आला मूर्तीकार,
म्हटला माझ्यासारखे दिसणारे पुतळे बनवेन मी हजार!
सगळ्यांना ऐकूनच वाटला हा चमत्कार,
“मान्य!” राजा म्हणाला.
मूर्तीकाराने अगदी हुबेहूब पुतळे बनवले. त्या सर्व पुतळ्यांना सारखी वेशभूषा आणि एक उभी राहण्याची विशिष्ट पद्धत देऊ केली. तशाच पद्धतीत आणि वेशभूषेत तो त्यांच्यात मिसळून उभा राहिला. राजाला बोलावलं गेलं. राजाने सगळ्या पुतळ्यांचं वेशभूषेसकट निरीक्षण केलं. राजाला त्याच्या skills चं आणि कलेचं कौतुक वाटलं, मात्र राजाला त्याची बोलण्याची पद्धत पटली नव्हती. मूर्तीकाराला त्याच्या skills चा अभिमान असता तर ठीक पण त्याला तर गर्व झाला होता. अभिमान असणं आणि स्वत:च्या कलेबाबत confident असणं उत्तम. पण overconfidence आपल्याला लयाला नेतो.
एरवी जर त्या माणसाने आपली ओळख अदबशीरपणे केली असती तर राजाने प्रांजळपणे आपली हार कबुल केली असती आणि म्हणाला सुद्धा असता की व्वा... काय हवंय ते मागून घ्या. पण राजाला या माणसाबाबत माणूस म्हणून अजिबातच आपुलकी वाटली नाही. त्यामुळे राजाने एक युक्ती केली आणि तो म्हणाला, “व्वा. सगळ्या मूर्ती हुबेहूब दिसत आहेत. चूक काढायला तशी तर जागाच नाही. पुतळे अगदी हुबेहूब आणिउत्तम आहेत पण एक कमी राहून गेली.”
‘कमी राहून गेली..’ असं ऐकताच पटकन अभावितपणे मूर्तीकार बोलून गेला, “कसली कमी?”
राजाने आवाजाचा रोख घेत पाहिलं आणि म्हणाला, “हीच ती कमी. जगात आपणच या गोष्टीत सर्वज्ञ आहोत आणि आपण हरूच शकत नाही असा अति-आत्मविश्वास... हीच ती कमी.”
राजाने मूर्तीकाराला ओळखलं होतं.
Confidence आणि overconfidence या मध्ये अगदी बारीक रेषेचा फरक असतो. ती लक्ष्मणरेषा पकडायची. त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे आपणच आपल्या अधोगतीची सुरुवात करणं. याचं कारण म्हणजे सुरुवातीला हा overconfidence एक वेगळी नशा देईल सुद्धा. पण नंतर आपल्याच नाशाला अथवा नुकसानाला सुद्धा तोच कारणीभूत ठरेल. आपण एखाद्या कलेमध्ये अथवा skill मध्ये पारंगत असू पण त्याला जोड हवी नम्रतेची.
राजा मूर्तीकाराला म्हणाला, “तू कलाकार म्हणून उत्तम आहेस. त्याला तोड नाही. माझं त्याबद्दल दुमत मुळीच नाही. अनेक जण ती कला देवाकडून येतानाच घेऊन येतात. तुमच्यासारखे कलाकार ती कला, ते कौशल्य विकसित करून उत्तम प्रकारे वापरतात; पण माणूस म्हणून उत्तम होणं जमलं तर कलाकारी जास्त उत्तम वाखाणली जाईल. आपण कदाचित या कलादालनात येण्याआधी याच्या दारावर कोरलेलं वाक्य वाचलं असतं तर मला हे सांगण्याची आवश्यकता भासली नसती.”
मूर्तीकार खजील झाला.
राजा पुढे
म्हणाला, “हां आणि नुसतं वाचून भागत नाही. ते अमलात नक्की आणावं.”
मूर्तीकाराने वाक्य वाचलं, “विद्या विनयेन शोभते!”
![]() |
| Photo Courtesy: Poonam Godse |
-वरुण भागवत

Confidence आणि overconfidence मधील फरक अगदी योग्य आणि सोप्या उदाहरणाने दिले आहे. खूप छान.
ReplyDelete👍👍
ReplyDeleteसुरेख.
ReplyDelete👌👌☝️🙏🙏
ReplyDeleteVery well depicted! 👏👏
ReplyDeleteउत्तम!
ReplyDeleteExplained very well giving apt examples.
ReplyDeleteExplained very well giving apt examples.
ReplyDeleteVery True 👍
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhup chan ��
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDeleteछानच लिहिलंय.... आवडलं!
ReplyDeleteअप्रतिम लिखाण, साधी सोपी सरळ भाषा
ReplyDeleteNice👍
ReplyDeleteउत्तम रितिने गोष्ट लेखन चालु आहे.keep it up आजहि
ReplyDeleteगोष्ट छान लिहिलि आहे
मस्त
ReplyDeleteSimple but perfect example,
ReplyDeleteBest writing