Skip to main content

अवघड परिस्थिती आणि Decision Making

Photo Courtesy: Poonam Godse

सीमाचं आयुष्य दोन दगडांवर अवलंबून होतं. काळ्या आणि पांढऱ्या. उद्याचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा होता. आज जे तिने केलं होतं ते योग्य होतं की अयोग्य याचा विचार करायला आता तिच्याकडे वेळ नव्हता. परिणामांना आणि परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं होतं.

ही गोष्ट त्या काळातली होती जेव्हा मुलीचा सौदा वगैरे हे अगदी सहज केलं जायचं. अतीशय फुटकळ कर्ज वसूल करण्यासाठी किंवा फालतू कारणाने मुलीचा सौदा कवडीमोलाने केला जायचा.

सीमाचे वडील कर्जामध्ये बुडाले होते. बुडाले म्हणण्याइतकं ते काही कर्ज मोठं नव्हतं. मात्र कर्ज देणाऱ्या सावकाराच्या मनात वेगळच होतं. त्यामुळे त्याने आकडा फुगवून सांगितला होता. सीमा आणि वडिलांकडे कसलेच records नव्हते. सावकाराने याच संधीचा फायदा घेतला. त्याने सीमाच्या वडिलांसमोर २ पर्याय ठेवले.

१.    -उद्याच्या उद्या कर्जाची रक्कम फेडली गेली पाहिजे.

२.    -नाही फेडली तर तुझी ही तरुण मुलगी माझी दासी असेल.

सीमाचे वडील गयावया करू लागले. सीमा आतल्या खोलीत होती. ती ऐकत होती. घाबरली होती.

सीमाचे वडील रडत म्हणाले, “अजून काही वेगळा पर्याय नाही का सरकार?”

सावकार दया दाखवण्याचं नाटक करत म्हणाला, “ठीके, उद्या आपण एक खेळ खेळू. एका डब्यामध्ये मी दोन दगड ठेवीन. एक काळा आणि दुसरा पांढरा. तुझ्या मुलीलाच निवड करू दे.”

सीमाचे वडील प्रश्नार्थक नजरेने म्हणाले, “कसली निवड?”

सावकार उत्तरला, “तुमच्या नशिबाची. दोन्ही दगड डब्यात घालून तो डबा आपण बंद करू. मग न बघता तिला त्या डब्यातून एक दगड उचलायचा आहे. काळा असेल तर ही माझी आणि तरीसुद्धा तुझं कर्ज मुक्त.  पांढरा असेल तर तू कर्जमुक्त होशीलच आणि ही पण मुक्त होईल. खेळ एकदम न्यायाने होईल. बघ दोन्हीकडे तुझाच फायदा आहे.”

बाप काही बोलत नव्हता. दोन्ही पर्यायांमध्ये वडीलांचं कर्ज चुकतंय हा विचार करून पटकन सीमा म्हणाली, “अट मान्य!”

सावकाराला हेच हवं होतं. तो छद्मी हसत म्हणाला, “उद्या नदीकिनारी भेटू.”  

 

सीमाने जवळजवळ स्वतःचा सौदाच केला होता. अर्थात तिने हे मुद्दाम केलं नव्हतं. तिच्यासमोर परिस्थितीच अशी मांडून ठेवली होती की त्यातल्या त्यात best option निवडून आजचा दिवस तिने ढकलला होता. सीमाचे वडील काहीच बोलत नव्हते. पूर्ण रात्र अस्वस्थ गेली.

नवा दिवस उजाडला. ठरल्या प्रमाणे सगळे नदीकिनारी जमले. सावकाराने आपली हुशारी दाखवायला आणि साक्ष म्हणून खेळ किती न्यायाने खेळला जातो आहे हे दाखवायला चार माणसं जमवली होती.

सीमाच्या वडिलांनी कष्टाने स्वतःला ओढत तिथवर आणलं होतं. सीमा मात्र तिथे बारीक निरीक्षण करत होती. सगळ्यांच्या हालचाली टिपत होती. तिने पाहिलं की सावकार दोन दगड डब्यात भरतोय. काळ्या मनाच्या सावकाराने दोन्ही काळे दगड त्या डब्यात भरले. ही गोष्ट सीमाच्या नजरेतून सुटली नाही. पण अडचण अशी की उपस्थितांपैकी बाकी कोणालाच ती गोष्ट कळली नाही. आता तिच्यासमोर जुगार नव्हता. नशिबावर काही नव्हतं. तिला खेळाचा शेवट समजला होता. तिच्यासमोर पर्याय होते की

१.    -आहे त्या परिस्थितीला शरण जाणे.

२.    -पळून जाणे जे शक्य नव्हतं. हे ती आधी सुद्धा करू शकली नसती. कारण सावकाराची माणसं सतत       नजर ठेवून होती. तेव्हाही आणि आत्ता सुद्धा.

३.    -सावकाराचं पितळ उघडं पाडणे. पण अशाने सावकाराला एक संधी मिळेल हा खेळ पुन्हा घेण्याची.

४.    -हातात येईल तो दगड उचलून सावकाराच्याच डोक्यात घालणे.

A click by: Varun Bhagwat

सीमाला पूर्ण खेळ कळला. पायाखालची जमीन सरकून धरणीने पोटात घ्यावं असं तिला क्षणभर वाटलं. पण क्षणभरच, कारण नंतर ती एकदमच confident झाली. सावकाराने तिच्यासमोर डबा ठेवला. तिने ठरल्याप्रमाणे न बघता एक दगड उचलला. तिला माहीत होतं की हातातला दगड काळाच आहे. तिने उचललताना तो अशा प्रकारे मुठीत बंद केला की तो बाकी कोणाला दिसणार नाही आणि अतीशय वेगाने तो खाली टाकला. अशाप्रकारे की नदीकिनारी असणाऱ्या दगडांमध्ये तो मिसळून गेला.

सीमा पटकन मोठ्याने सर्वांना उद्देशून म्हणाली, “अरेरे... किती वेंधळी आहे आहे मी. आता पडलेला दगड शोधणं अशक्य आहे आणि खेळाच्या नियमानुसार डब्यात एक दगड काळा आणि एक पांढरा आहे. आता डब्यात जो दगड शिल्लक आहे त्याच्या विरुद्ध दगडाची निवड मी केली असेल. बरोबर ना शेठजी?”

अर्थातच डब्यात काळा दगड शिल्लक होता.

सीमा म्हणाली, “बघा, म्हणजे पडलेला दगड पांढरा असलाच पाहिजे. याचाच अर्थ खेळाच्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व गोष्टीतून मुक्त झालो आहोत.”

शेठजीचा खेळ स्वतःवरच उलटला होता. तो मान्य करूच शकत नव्हता की त्याने डब्यात दोन्ही काळे दगड ठेवले होते. असं केलं असतं तर त्याचीच नाचक्की झाली असती.

सीमाने अडचणीचं रुपांतर संधीमध्ये केलं होतं. अनेक पर्यायांमधून तिने smart decision घेतला होता.

A click by: Varun Bhagwat

    - वरुण भागवत

- 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...