| A Click by: Varun Bhagwat |
महाभारतामध्ये होता जरासंध. माणूस कसला, जवळजवळ राक्षस च तो. त्याने अनेक राजांना कैद केलं होतं. त्यांना वाचवणं गरजेचं होतं. जरासंधाला संपवण्याच्या उद्देशाने अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण मगध देशी गेले. जरासंध योद्धा होता. त्याने युद्धाचं आव्हान स्वीकारलं. भीम आणि जरासंध यांच्यात लढाई जुंपली. भीम बलशाली असला तरी जरासंध सुद्धा तुल्यबळ होता. मात्र एक क्षण आला, भीमाने संधी साधली आणि पूर्ण ताकदीनिशी जरासंधाला उभा फाडला. तिथून वळून तो विजयी मुद्रेने कृष्णाकडे जाऊ लागला. तेवढ्यात जरासंधाच्या हसण्याचा त्याला आवाज आला. त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना. त्याने वळून पाहिलं. पाहतो तर काय??? दोन तुकडे झालेला जरासंध पुन्हा जोडला गेला होता.
भीम भयंकर संतापला. त्याने त्याला परत फाडलं. पुन्हा काही क्षणांत तो
जोडला गेला. हे रहस्य त्याच्या जन्म कहाणी मध्ये दडलं होतं. एक प्रकारचं विचित्र
वरदान त्याला प्राप्त झालं होतं.
भीम शक्ती लावत होता पण एकाच दिशेने विचार करत होता. आजकाल corporate
च्या भाषेत याला functional fixedness असं म्हणतात. म्हणजेच पारंपारिक आणि एकाच
पद्धतीने विचार करणे. त्यामुळे तो हा problem सोडवू शकत नव्हता.
problem कितीही विचित्र असला तरी बारकावे लक्षात घेतले तर तो सोडवता
येऊ शकतो.
इथे तर कृष्ण उपस्थित होता. थकलेल्या भीमाला तो पाहत होता. भीमाने
पुन्हा जरासंधाला फाडलं होतं. फाडला म्हणजे तो मेला अशीच भीमाची समजूत होत होती.
त्याच्यापुढे तो काही करत नव्हता. फाडलेले दोन्ही भाग तिथेच जवळ असल्याने
स्वाभाविकच ते पुन्हा जोडले जात होते. पण कुठेतरी काहीतरी त्रुटी असणारच या
विचारात कृष्ण असताना जरासंध पुन्हा जोडला जात होता. त्याच वेळी कृष्णाने भीमाला
आपल्याकडे बघण्यासाठी खुणावलं. त्याने बाजूला पडलेलं केळीचं पान उचललं. भीम
जरासंधाला फाडत होता तसं त्याने ते मधोमध फाडलं. पण भीम जसं त्याला फाडून तिथेच
थांबत होता तसं तेवढंच करून कृष्ण थांबला नाही. त्याने फाडलेल्या पानाचे तुकडे
विरुद्ध दिशांना आणि ते ही लांब फेकले.
भीम समजायचं ते समजला. त्याने पुन्हा जरासंधाला फाडलं आणि तो जोडला जाण्याआधी त्याचे दोन्ही तुकडे विरुद्ध दिशांना फेकले की जेणेकरून ते जोडले जाणार नाहीत. आता खऱ्या अर्थाने भीमाला solution मिळालं होतं. कृष्णाच्या creative thinking च्या मदतीने problem solve झाला होता.
हाच विचार भीम कदाचित करू शकला असता. पण तेव्हाच जेव्हा त्याने ठरवलं
असतं की सीधे हाथ से घी ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है...
problems हे solutions पेक्षा मोठे नसतात. पण तोच ठरलेला विचार कधीतरी
सोडावा लागतो. जशी शक्ती सोबत युक्ती वापरावी लागते तशी पारंपारिक विचाराला
अपारंपरिक, निराळ्या विचाराची जोड द्यावी लागते. अशी जोड दिली की जरासंध पुन्हा
जोडला जात नाही.
-वरुण भागवत
भारी !👌
ReplyDeleteEffective Communication Varun
ReplyDeleteवा छान
ReplyDeleteबेष्ट! अति बेष्ट!👌 कॉर्पोरेट महाभारत
ReplyDeleteअत्यंत सोप्या समजेल अशा भाषेत आणि तरीही तितकंच रसाळ आणि creative... अप्रतिम
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteKya baat. ...waah👌👌
ReplyDelete