| A Click by: Varun Bhagwat |
जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच. नंतर थोडा सावरलो. मग त्यावर विचार करू लागलो. एका जिराफाचा जन्म होण्यापासून त्याच्या आयुष्याचा संघर्ष सुरु झाला. जिराफाचं बाळ जन्माला येताना ते साधारण ८ फुटांवरून आईच्या पोटातून खाली पडलं. जिराफाच्या आई ने आपली मान खाली केली. त्याच्या जवळ गेली. त्याला गोंजारते आहे असं वाटत असताना तिने त्याला लाथ मारली. नवजात बालक उडून पुढे पडलं. ते थोडंसं हलायचा प्रयत्न करू लागलं. पायावर उभं राहायच्या पहिल्या प्रयत्नात ते फसलं. पडलं. आई जवळ आली. तिने पुन्हा त्याला लाथ मारली. पुन्हा ते लांब जाऊन पडलं. पुन्हा बाळ उठायचा प्रयत्न करत होतं. असफल होत होतं. आई पुन्हा त्याला पायाने ढकलत होती. हे तोपर्यंत घडत राहिलं जोपर्यंत ते आपल्या पायावर उभं राहून चालत नव्हतं. एक क्षण आला तेव्हा बाळ नुसतं पायावरच उभं नाही राहिलं तर ते पुढे जाऊ लागलं. आईने प्रेमाने जवळ घेतलं.
सुरुवातीला वाटलं काय निर्दयीपणा आहे हा... असं कसं आणि का करावं?
उत्तर सोपं होतं. जिराफाच्या आईला स्वत:च्या बाळाला लवकरात लवकर पायावर उभं करायचं
होतं.. त्याचं मुख्य कारण म्हणजे असे छोटे जिराफ अथवा अशी पिल्लं म्हणजे हिंस्त्र
श्वापदांच अर्थात वाघ, सिंह, चित्ते यांच्यासारख्यांचं आवडतं खाद्य. आपल्या बाळाला
जन्माला आल्या आल्या कोणाचं तरी खाद्य बनू देण्यापेक्षा त्याला त्याच्या त्याच्या संरक्षणासाठी
लवकर उभं करणं हा आणि असा सरळ हेतू आईचा होता.
आपलं आयुष्य अनेकदा जिराफाच्या आईसारखं वागतं. आपल्याला कसलीच कल्पना
नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे.
पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... आपण आधी विचार करतो की आपल्याच बाबतीत
का? मी काय केलंय? माझं का असं व्हावं? बाकीच्यांना तर असं काही सहन करावं लागत
नाही. पण खरं पाहायला गेलं तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या दिव्यातून कधी ना
कधी जावंच लागतं. कालांतराने नीट विचार केला तर लक्षात येतं की ह्यात आयुष्य शिकवत
असतं की वाईटात वाईट हे होऊ शकतं.. तू तयारीत राहा. मग वाटतं की आपण अशी एखादी लाथ
बसल्यावर अर्थात वाईट्ट परिस्थिती असताना सुद्धा मार्ग काढू शकतो तर मग या पेक्षा
वाईट काय होणारे? त्यामुळे या परिस्थितीला दोष न देता त्यातून हा विश्वास बाळगायचा
की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. हा विश्वास आणि ही तयारी महत्वाची!
आपल्यामागे किमान वाघ सिंह तरी लागलेले नसतात. जिराफाला तर जन्मल्या
जन्मल्या अस्तित्वाचा आणि जगण्याचा प्रश्न असतो. आपण विचार करू शकतो. बुद्धी वापरू
शकतो. बसणाऱ्या लाथेचा सामना करू शकतो.
एकदा तो विश्वास आला की मग जिराफासारखं ताठ मानेने जगू
सुद्धा शकतो.
- वरुण भागवत
Sahi sir
ReplyDelete👍👍
ReplyDeleteBarobar ahe sir.
ReplyDeleteDhanyawad
DeleteVery nice VARUN.
ReplyDeleteWah..chaan correlate kela👌👌
ReplyDeleteअगदी खरंय, माणसाने सुरक्षीत कोषातून लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे.
ReplyDeleteyes..
Deleteखूप छान वरुण
ReplyDeleteWonderful!
ReplyDeleteThank you.
DeleteSalute to you Varun
ReplyDeleteThank you
Deleteसुंदर
ReplyDeleteवरूण छान
ReplyDeleteBharich
ReplyDeletethanks
DeleteKharach!
ReplyDeleteSagalejan Tatha manene jaguyat....
Khup Chan message....