Skip to main content

जन्माला येताच बसली लाथ...

 

A Click by: Varun Bhagwat

जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच. नंतर थोडा सावरलो. मग त्यावर विचार करू लागलो. एका जिराफाचा जन्म होण्यापासून त्याच्या आयुष्याचा संघर्ष सुरु झाला. जिराफाचं बाळ जन्माला येताना ते साधारण ८ फुटांवरून आईच्या पोटातून खाली पडलं. जिराफाच्या आई ने आपली मान खाली केली. त्याच्या जवळ गेली. त्याला गोंजारते आहे असं वाटत असताना तिने त्याला लाथ मारली. नवजात बालक उडून पुढे पडलं. ते थोडंसं हलायचा प्रयत्न करू लागलं. पायावर उभं राहायच्या पहिल्या प्रयत्नात ते फसलं. पडलं. आई जवळ आली. तिने पुन्हा त्याला लाथ मारली. पुन्हा ते लांब जाऊन पडलं. पुन्हा बाळ उठायचा प्रयत्न करत होतं. असफल होत होतं. आई पुन्हा त्याला पायाने ढकलत होती. हे तोपर्यंत घडत राहिलं जोपर्यंत ते आपल्या पायावर उभं राहून चालत नव्हतं. एक क्षण आला तेव्हा बाळ नुसतं पायावरच उभं नाही राहिलं तर ते पुढे जाऊ लागलं. आईने प्रेमाने जवळ घेतलं.

 

सुरुवातीला वाटलं काय निर्दयीपणा आहे हा... असं कसं आणि का करावं? उत्तर सोपं होतं. जिराफाच्या आईला स्वत:च्या बाळाला लवकरात लवकर पायावर उभं करायचं होतं.. त्याचं मुख्य कारण म्हणजे असे छोटे जिराफ अथवा अशी पिल्लं म्हणजे हिंस्त्र श्वापदांच अर्थात वाघ, सिंह, चित्ते यांच्यासारख्यांचं आवडतं खाद्य. आपल्या बाळाला जन्माला आल्या आल्या कोणाचं तरी खाद्य बनू देण्यापेक्षा त्याला त्याच्या त्याच्या संरक्षणासाठी लवकर उभं करणं हा आणि असा सरळ हेतू आईचा होता.

 

आपलं आयुष्य अनेकदा जिराफाच्या आईसारखं वागतं. आपल्याला कसलीच कल्पना नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे. पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... आपण आधी विचार करतो की आपल्याच बाबतीत का? मी काय केलंय? माझं का असं व्हावं? बाकीच्यांना तर असं काही सहन करावं लागत नाही. पण खरं पाहायला गेलं तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या दिव्यातून कधी ना कधी जावंच लागतं. कालांतराने नीट विचार केला तर लक्षात येतं की ह्यात आयुष्य शिकवत असतं की वाईटात वाईट हे होऊ शकतं.. तू तयारीत राहा. मग वाटतं की आपण अशी एखादी लाथ बसल्यावर अर्थात वाईट्ट परिस्थिती असताना सुद्धा मार्ग काढू शकतो तर मग या पेक्षा वाईट काय होणारे? त्यामुळे या परिस्थितीला दोष न देता त्यातून हा विश्वास बाळगायचा की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. हा विश्वास आणि ही तयारी महत्वाची!

 

आपल्यामागे किमान वाघ सिंह तरी लागलेले नसतात. जिराफाला तर जन्मल्या जन्मल्या अस्तित्वाचा आणि जगण्याचा प्रश्न असतो. आपण विचार करू शकतो. बुद्धी वापरू शकतो. बसणाऱ्या लाथेचा सामना करू शकतो.

एकदा तो विश्वास आला की मग जिराफासारखं ताठ मानेने जगू सुद्धा शकतो.

 

-       वरुण भागवत

Comments

  1. Wah..chaan correlate kela👌👌

    ReplyDelete
  2. अगदी खरंय, माणसाने सुरक्षीत कोषातून लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे.

    ReplyDelete
  3. खूप छान वरुण

    ReplyDelete
  4. Kharach!
    Sagalejan Tatha manene jaguyat....
    Khup Chan message....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...