| A Click by: Varun Bhagwat |
अमन कामाला आला आणि आल्या आल्या त्याची रजतशी
गाठ पडली. दोघे एकाच department मध्ये होते. Office च्या main gate पासून आत
department पर्यंत पोचायला ५-१० मिनिटे लागत.
“बरा
भेटलास इथेच. आत्ता जे मी बोलणारे ते आत नाही बोलता येणार.”
“का? काय झालं?”
“अमन, असा कसा रे तू? मला तुझं एक कळत नाही.
आपल्याला office मध्ये इतकी कामं असतात तरी त्यात तुला दुसऱ्यांची कामं करायची
किती हौस!”
“त्याला काय होतं? अशी काय मोठी गोष्ट असते
त्यात?”
“हे बघ तुझ्यासारखा इतका साधा विचार करत नाहीत
बाकीचे.”
“पण माझी अपेक्षा पण नाहीये त्यांनी असा
विचार करावा अशी.”
"पण त्या कामाचा काही तुला जास्त पगार मिळतो
का?”
“नाही रे रजत.”
“मग कशाला? कोणी त्याची परतफेड पण करत नाही
तर तुला काय पडलेली असते त्यांची?”
“माणसंच माणसांच्या उपयोगी पडतात.”
“पण परतफेडीचं काय?”
“सारखे हिशोब कशाला मांडायचे?”
“मी मांडतो बुवा आणि परवा मी वाचलेल्या एका
गोष्टीने ते prove पण झालंय.”
“कोणत्या गोष्टी वाचत बसतोस बाबा तू रजत?”
“बैलजोडी मधला एक बैल आजारी पडला. मग
शेतकऱ्याने आपल्या मालवाहू गाढवाला बैलगाडीला दुसऱ्या बैलासोबत जुंपलं. दिवसभर शेत
नांगरल्यावर दोघे थकले. बैल म्हणाला, “दमलो बुवा.” गाढव म्हणालं, “हो ना. आता
मालकाचं ओझं वाहून न्यायचं काम पण दोघं मिळून करून.” यावर बैल जबाबदारी झटकत
म्हणाला, “ए, ते तुझं काम आहे. माझं नाही.” रजत पुढे बोलला, “कळलं का काही? अशी
उपयोग करून घेतात माणसं! तू कर त्या गाढवासारखी इतरांची कामं. तुझं reward काय तर
तुझं काम पण तूच कर आणि त्यांचं सुद्धा.”
“रजत, शांत हो. तू कशाला चिडचिडला आहेस? सगळी
माणसं त्या बैलासारखी नसतात.”
“पण सगळे चांगले सुद्धा नसतात. मग आपण गाढव
ठरतो.”
“मी तुझं म्हणणं अमान्य करत नाही. पण कोणाला
मदत लागत असेल तर मी ती मदत करणं नाकारत सुद्धा नाही.”
“ते तुझा उपयोग करून घेत असले तरी?”
“असं नाहीये.”
“असंच आहे. ते त्या बैलासारखे तुझ्याशी
वागलेले आपल्याला आवडत नाही.”
“बरं,
करू देत उपयोग. असा विचार कर की मग कधीतरी त्या बैलावर सुद्धा वेळ येईल.”
“अशी कशी येईल?”
“मला ते गाढव म्हणतो आहेस ना तू.”
“तसं नाही रे.”
“नाही उदाहरणादाखल मी ते गाढवच आहे तुझ्या
गोष्टीतलं असं समज! मग आता या गोष्टीत पुढे काय होतं माहितीये?”
“काय?”
“त्या दिवशीच्या अतीश्रमाने गाढव आजारी पडतं.
दुसरा बैल आजारी असतोच. मग शेत नांगरायची पूर्ण जबाबदारी या एकट्या बैलावर येते
आणि ओझं वाहायची सुद्धा. मग बैलाला चूक समजते आणि गाढव आणि बैल मित्र होतात.”
“वा वा वा वा... happy ending. पण मग तुझ्या
आजारी होण्याची वाट पाहायची का या बैलांनी. अरे तो सतीश... या बैलांपैकीच.. इतक्यातच
join केलंय त्याने. किती घाबरला होता. काय त्याचा report होता. तू नीट करून दिला
तेव्हा कुठे तो madam ना दाखवण्याजोगा झाला. पण त्याचं काम उरकलं आणि सालं साधं
thank you पण नाही.”
“दुसऱ्याचं चांगलं केल्याने आपलं वाईट होत नाही
इतकं मला कळतं.”
“पण सगळे तसे नसतात. फायदा घेणारे पण असतात.
“असे लोक तू ओळखतोस.”
“प्रश्नच नाही.”
“बरं
रजत ऐकतो तुझं. हे बघ, कोणी मला एखादं काम देत असेल ना.. आपलं नेहमीचं काम सोडून...
तर डोळा मारून सांगत जा यांचं काम घ्यायचं की नाही. उजवा मारलास तर घेणार आणि डावा
मारलास तर नाही घेणार. Done?”
“मी तर सतत डावा डोळा मारत राहीन.” रजत हसत
म्हणाला.
अमन दिलखुलास हसला. Department चा दरवाजा उघडून ते आत गेले.
अमनच्या टेबल वर एक ‘Thank you’ card होतं. अमनने उघडून पाहिलं- आत लिहीलं होतं- माझ्या
report मधले points presentable पद्धतीत मांडून तुम्ही तो एकदम clean बनवलात. Madam
खुश झाल्या. आज जाणवलं की माझे reports चुकत नव्हते. त्यात माझी expertise आहे. पण
ते मांडण्याची पद्धत तुम्ही शिकवलीत. आता माझ्यासाठी ते काम एक reference म्हणून
राहील. Thank you again. सामोसा party करू तुम्हाला जमेल तेव्हा.” – सतीश.
रजत ने पण हे वाचलं होतं. हाच तो सतीश ज्याला
रजत काही वेळापूर्वी बैल म्हणाला होता. अमन आणि रजत ने एकमेकांकडे पाहिलं. रजत ने
दोन्ही डोळे मिचकावले.
अमन confused होत म्हणाला, “हे काय? उजवा
मारला तर काम घ्यायचं. डावा मारला तर नाही असं ठरलंय ना. दोन्ही का मारलेस?”
रजत शांतपणे म्हणाला, “दोन्ही डोळे मारले
कारण तू ठरव कोणाचं काम घ्यायचं आणि कोणाचं नाही ते. कारण माणसांची पारख माझ्यापेक्षा
तुला जास्त आहे.”
-
वरुण
भागवत
-
Waa..👌👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteनॉर्मली आपण रजतच असतो आणि अमनला नक्कीच हेच सांगत असतो, real story
ReplyDeleteमस्त गोष्ट आहे
ReplyDeleteKhupach sunder
ReplyDeleteNice story...
ReplyDelete