“आजी मी खरंच वैतागले आहे आता.”
“झालं तरी काय?”
“problems, problems आणि फक्त problems...”
“त्यातून काहीतरी पुढे चांगलं होणार असेल.”
“problems ने कोणाचं कधी काही चांगलं होतं
का?”
“बरं बाई, नसेल होत. ते सोड. मी सांगितलेल्या
गोष्टी आणल्यास का बाजारातून?”
“हो. हे घे. बटाटे, अंडी आणि coffee पावडर.”
आजीने शेगडी वरती ३ पातेल्यांमध्ये गरम पाणी
उकळत ठेवलं होतं. त्यातील एका पातेल्यात तिने बटाटे घातले. दुसऱ्यात अंडी आणि
तिसऱ्या पातेल्यात coffee पावडर घातली. मध्ये थोडा वेळ गेला. नात हॉल मध्ये जाऊन
बसली. थोड्या वेळाने आजी बाहेर येऊन पुन्हा नातीशी गप्पा मारू लागली.
“हां, कसले problems गं?”
“जसं आहे तसं काही राहू नाही का शकत काही?”
“काय आहे तसं ठेवायचं आहे? पहिले जाऊन ती
पातेली उतरव.”
“उतरवली.”
“इकडे आण.”
“आज आपण उकडलेले बटाटे, अंडी आणि coffee असं खाणार
आहोत का आजी?”
आजी मनापासून हसत म्हणाली, “खूप दिवस झाले
तुझं ऐकत होते आज विचार केला की एक प्रयोग करूया.”
“कसला प्रयोग?”
“बटाट्यांना हात लाव बरं.”
“काय?”
“अगं लाव तर... हां, काय जाणवलं?”
“ते गरम आहेत.”
“ते असणारच.. अजून?”
“मऊ झालेत.”
“अरे वा. अंडी बघ.”
“उकडली गेलीयेत.”
“coffee बघ.”
“coffee ला कसा हात लावू? आजी म्हणायचं काय
आहे तुला?”
“हे ३ पदार्थ म्हणजे ३ माणसं आहेत असं समज.
गरम पाणी हे त्यांचे problems आहेत. प्रत्येक जण problem ला सामोरा गेल्यावर
वेगवेगळा react झाला.”
“त्यात काय... प्रत्येक गोष्ट शिजली.”
“तसं नाही... अगं थोड्या वेगळ्या नजरेतून
बघ.”
“म्हणजे?”
“बटाटे बाजारातून आले तेव्हा चांगले कडक
होते.. अर्थात strong होते असं म्हणूया. पण पाण्यात शिरल्यावर म्हणजेच problem ला
सामोरं गेल्यावर लेचेपेचे म्हणजेच weak झाले. अंडी वेगळीच वागली. आधी आवरणाच्या आत
liquid होतं. problem ला सामोरं जाताच ते घट्ट झालं. थोडक्यात ते स्वभावाने rigid
झालं असं म्हणू. coffee ने मात्र problem ला संधी मानलं. बाळा, तू ठरव यातलं तुला
कोण व्हायचं आहे. problems ला सामोरं जायला ही coffee शिकवते बघ. problems,
problems आणि फक्त problems असं नुसतं म्हणून काही होत नाही. त्याला भिडलं की वाफाळत्या
coffee सारखं best end product मिळतं. ”
नातीने coffee चा वास घेतला नि आजीला
म्हणाली, “हं... coffee best च आहे. पण आजी, हा प्रयोग कुठून शिकलीस?”
“अगं आपल्या शेजारी ते retired professor
राहायला आले आहेत ना ते काल घरी आले होते तर मी त्यांच्यासाठी coffee केली होती. त्यांना तो coffee चा सुगंध इतका आवडला आणि
त्यांना अचानक त्यांच्या students ना सांगितलेली ही गोष्ट आठवली आणि मग त्यांनी ती
मला सांगितली. त्यांनी तोंडी सांगितली आणि मी प्रात्यक्षिक करायचं ठरवलं.”
“कशाला?”
“तुला शिकवायला... होतील problems solve. आणि सगळे problems solve झाले तर राहतच काय मग... असो आणि कामात काम झालं ना माझं... आता
नाश्त्याला ही उकडलेली अंडी आणि coffee. बटाटे उकडले म्हणजे दुपारच्या भाजीची पण सोय
झाली बघ. फोडणी दिली की झालं.”
“पण coffee एक कपच केलीस आजी.”
“ती तू घे. कारण माझी coffee आज retired
professor कडे आहे.”
“आं?”
-वरुण भागवत
Coffee tar best ch ahe.
ReplyDeleteCoffee Ani barech kahi
ReplyDeleteCoffee is change of mind
ReplyDeleteI like coffee ....☕
ReplyDeleteCoffee cha ghot pitanacha tu lihilela blog vachala...,
Vachlynantar ,
coffee LA☕
Ajuncha Mazya Javal aanlas.. 🙋
Thank you once again Varun.... 😍😍🙏🙏
Coffee..the Best
ReplyDeleteThank you everyone.... :)
ReplyDeleteChan ... change of mind
ReplyDelete