![]() |
| A Click by: Varun Bhagwat |
आशा आणि सोना cafe मध्ये भेटल्या. Coffee आणि sandwich ची order
place केली. सोना ला हवं ते sandwich नेमकं available नव्हतं.
“एक गोष्ट आयुष्यात हवी तशी घडत नाहीये.” सोना वैतागून म्हणाली.
“Chill कर.” आशा उत्तरली.
“काय chill करू?” बाकी सोड. मला हवं आहे ते sandwich सुद्धा मिळू नये
म्हणजे अती झालं.” आणि सोनाच पुढे तोंड वेंगाडत म्हणाली, “आणि तुझं आपलं चालू
असतं, आपली energy आपल्याशी बोलत असते. आपण जशी energy लावतो तसं फळ मिळतं. कुठे
मिळालं फळ?”
“ह्याला बादरायण संबंध जोडणे असं म्हणतात.” आशा शांतपणे म्हणाली.
“What संबंध?” सोनाने तो शब्द ऐकून विचारलं.
“अगं म्हणजे कुठलाही संबंध कुठेही जोडणे. तुझं business struggle आणि
sandwich याचा काहीच संबंध नाही.”
“बरं नसेल. पण मग माझा business मोठा का होत नाहीये?”
“प्रयत्नांना जोड हवी आपल्या सकारात्मकतेची.”
“हे असं काही नसतं.”
“असतं.”
“Oh... come on.”
आशा सांगू लागली, “तुझा विचार याच दृष्टीने जातोय की माझा business
मोठा होत नाहीये.”
“अर्थात.”
“थोडा असा विचार करून बघ की business मोठा होणारे.”
“असा आपोआप होईल का?”
“मुळीच नाही, पण जेव्हा तो grow व्हावा असा विचार सुरु होईल तेव्हाच
तो grow कसा करता येईल या दृष्टीने पण विचारचक्र सुरु होईल. आपोआप तू वेगवेगळ्या ideas
चा विचार करू लागशील.”
“तरी काही नाही झालं तर...”
“अशी negativity घेऊन फिरलीस तर असं पण काही चांगलं घडणार नाही.”
“अरे अनेकदा आपण प्रयत्न करतो पण परिस्थिती पण साथ देत नाही. असं
घडतं यार... मग काय करायचं?”
“माणूस आशेवर जगतो.”
“प्रवचन mode मध्ये जाऊ नको.”
“सोना पण हे खरंय.”
“चल ठीके, मी प्रयत्न केले... पण ही ‘आशा’ कशी आणायची?”
“तीच आपल्याला पुढे नेते.”
“Give me one good example.”
“अगं कित्ती लहान असताना ऐकलेली story आहे. तुला childish वाटू शकते.
पण माझ्यासाठी ऐक.”
“बोला.”
आशा गोष्ट सांगू लागली, “एका गावात दुष्काळ पडला होता. आता हे
तुझ्याशी connect करायचा प्रयत्न कर. बघ हां.. दुष्काळ म्हणजे परिस्थिती आपल्या
हातात नाही. Correct?”
“Yeah!” सोना उद्गारली.
“म्हणून मग सगळे गावकरी देवाची प्रार्थना करू लागले. आता हे प्रयत्न
आहेत असं समजूया. आता पाऊस पाडणं काही तेरे मेरे बस की बात नही. म्हणजेच लगेच
परिस्थिती बदलणं शक्य नाही. पण गावातला एक मुलगा सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो
प्रार्थनेला आला पण छत्री घेऊन आला. ह्याला म्हणायचं आशा! त्याची positivity
कित्ती matter करते बघ. पाऊस पडेल ही आशा सोबत घेऊन तो आला. म्हणून मी मगाशी
म्हणलं की माणूस आशेवर जगतो. 'आज नाही तर उद्या होईल' ही आशा जीवंत असली पाहिजे.”
“आप great हो. पण माझा धीर
सुटतो.”
“असा धीर सुटून कसं चालेल?” आशा सोनाला टप्पल देत म्हणाली.
सोनाला थोडा मस्करीचा mood आला आणि ती म्हणाली, “बरं, पण मी इथे आशा
करतीये की माझं sandwich मला हवंय; पण ते आहे का इथे? आता इथे काय संबंध positive- negative thoughts चा?”
“तू उगाच sandwich वर येऊ नको. इथे पण सांगते, we can always
change the restaurant. पण तू इथेच अडकून पडलीये. इथे मिळत नाहीये तर उठ. दुसरीकडे
जाऊ.” आशा सांगत होती.
“हा विचार केलाच नाही गं.” सोना पुन्हा विचारात गेली.
-वरुण भागवत

Nice 👍
ReplyDeleteMasta
ReplyDeleteवा मस्त, positive energy is must in your life for better prospects, be positive
ReplyDeleteChaan. ....👍.., law of attraction
ReplyDeleteAgain energy thought...
ReplyDeleteMast
ReplyDelete1 no... 👌👌
ReplyDeleteTuza blog amchya aayushat khup kahi matter Karto... 🙋
It's all created goes to u.... 👍👍