Skip to main content

Corporate मधला वाद

A click by: Varun Bhagwat


“सर कळत नाहीये या नवीन मुलाशी वागावं तरी कसं?”

“तो तुझ्या team मधला new joiner का?

“हां...”

“काय बरं नाव त्याचं, विनय ना?”

“हो ना. इतकं talent आहे. पण नव्या ideas बाहेरच काढत नाही.”

“ऐक राजीव... तुझा नेहमीचा फंडा मला महिती आहे काम करून घेण्याचा. सगळीकडे तो चालत नाही.”

“म्हणजे काय सर? कामं व्हायला नकोत का वेळच्या वेळी?”

“मला मान्य आहे. तुला results महत्त्वाचे आहेत right?

“हो.”

“मग पद्धत ज्याला जशी हवी तशी वापरू दे ना.”

“पण मी कुठे अडवतो?”

“अडवत नाहीस. मध्ये मध्ये करतोस. force करतोस की हे अशा पद्धतीने करा म्हणून.”

“पण आपण असेच मोठे झालो ना...”

“पण प्रत्येक जण वेगळा असतो ना. प्रत्येकाची काम करायची पद्धत पण वेगळी असते.”

“मग या विनयने सुद्धा आपल्यासारखी पद्धत आत्मसात करावी आपल्या company मध्ये आहे तर.”

“असं नसतं. Understand, let him play his natural game.”

“What do you mean?”

“तुझ्या actions या result कडे नेणाऱ्या असल्या पाहिजेत. एक गमतीदार गोष्ट सांगतो. एकदा ना वारा आणि सूर्य या दोघांमध्ये वाद झाला. Typical corporate वाद. कोण जास्त चांगलं काम करवून घेऊ शकतं वाला...”

“सर वारा आणि सूर्य...”

“ऐक तर.. त्यांच्यात गमतीदार पैज लागली. मोकळ्या रस्त्यावरून एक माणूस जात होता. जो त्याचे कपडे काढून दाखवेल तो जिंकणार अशी पैज होती.”

“आवरा.”

“ऐक तर. वाऱ्याने सुरुवात केली. त्याने जोरदार हल्ला चढवला. माणसाचे कपडे उडून जाणं अपेक्षित होतं. पण घडलं उलटंच. माणसाने कपडे जास्त घट्ट पकडून ठेवले. वाऱ्याला राग आला. त्याने अजूनच force लावला आणि अजून वेगाने वाहू लागला. तर माणसाने स्वत:जवळ असलेली घोंगडी पांघरली. In short तो काम न करण्याचे/ कामापासून पळण्याचे नवे उपाय शोधू लागला. शेवटी वारा सूर्याला म्हणाला की तू कर बाबा try.”

“मग सूर्याने काय केलं?”

“सूर्याने आधी कोवळी उन्हं माणसाच्या अंगावर पसरवली. म्हणजेच company मध्ये as a new joiner त्याच्यासाठी थोडं comfortabale वातावरण निर्माण केलं.  त्यामुळे माणसाने आपली घोंगडी दूर केली. मग नंतर सूर्याने आपली प्रखरता वाढवली. अर्थात boss ने productivity वाढवण्यासाठी positive प्रयत्न सुरु केले. माणसाने हळूहळू कपडे काढायला सुरुवात केली.

“म्हणजे new joiner ने efforts घ्यायला सुरुवात केली.

“Right. तो तेवढ्यावर थांबला नाही. नंतर जवळच असणाऱ्या नदीमध्ये डुंबू लागला.”

“म्हणजेच स्वत:हून तो जास्तीचं काम करायला तयार झाला.”

“Yes. Now you got the point. ही process step by step असल्याने कुठेच forced नव्हती.”

“कळलं सर.”

“हे बघ, माणसा-माणसा नुसार पद्धत बदलेल. पण तुझ्या मते याच्यात जर talent आहे तर याच्या बाबत याने काय काम करायचं हे तू ठरव. मात्र कसं करायचं हे त्याला ठरवू दे. प्रयत्न करून बघ. नाही तर अजून वेगळी method. आपल्या meetings होत राहतील.”

“आणि तुम्ही माझी शाळा घेत रहाल?”

“Correct!”

 

-वरुण भागवत         

 


 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...