| A Click by: Varun Bhagwat |
तुम्हाला वीरेंद्र सेहवाग माहितीये?
वीरेंद्र सेहवाग उर्फ ‘वीरू’ म्हणजे भारताचा
एके काळचा उत्तम opening batsman.
त्याला तुम्ही batting करताना पाहिलंय?
अनेकांनी त्याला batting करताना पाहिलं असेल.
पण आता महत्त्वाचा प्रश्न. त्याला तुम्ही batting करताना ऐकलंय? ऐकलं नसेल तर
नक्की ऐका. त्याचं कारण सुद्धा तसं आहे.
काम करण्याची ज्याची त्याची पद्धत असते. काम
enjoy करण्याची सुद्धा ज्याची त्याची पद्धत असते. काहींना गाणी ऐकत काम करायची सवय
असते. काही जणांना गाणी गात काम करण्याची सवय असते. आता मुद्दाम गाण्याबद्दल
बोलतोय कारण वीरू गाणी गात batting करायचा. गाणी गात sixers सुद्धा मारायचा. आपला
कामामधील attitude खूप matter करतो.
एक किस्सा... सेहवाग २९५ runs वर batting करत
होता. ही match २००४ साली मुलतान येथे चालू होती. या आधी २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया
विरुद्ध एका कसोटी सामन्यात वीरू १९५ runs वर असताना sixer मारायला गेला आणि out
झाला होता. तेव्हा तो त्याच्या २०० धावांचा landmark तो गाठू शकला नव्हता..
या वेळी तर mile stone अजून मोठा होता.
पाकिस्तान विरुद्ध २९५ वर असणाऱ्या वीरूला ५ एकेरी धावा अर्थात 5 singles काढून
३०० करणं शक्य होतं. पण मग तो वीरू नसता वाटला. त्याने चेंडू पडल्यावर पाय पुढे
टाकला आणि अशा पद्धतीत bat फिरवली की ball थेट प्रेक्षकांमध्ये... पहिल्यांदा ३००
धावा करणारा भारतीय म्हणून त्याचं नाव कोरलं गेलं.
भीती आपल्याला यशापासून मागे तरी खेचते किंवा
थोडा safe game खेळायला सांगते. पण कधी न कधी या safe zone पासून comfort पासून
बाहेर येऊन एखादी sixer मारावीच लागते. एखादी परिस्थिती जेव्हा आपल्या समोर उभी
ठाकते तेव्हा आपण पूर्वीचा तशा पद्धतीचा प्रंसग आठवतो आणि आपली त्या वेळेला झालेली
हार आठवतो आणि रिस्क घ्यायला बिचकतो. मात्र वीरू इकडेच जिंकला. त्याने स्वतःच्याच
भीतीला सणसणीत sixer ने उत्तर लगावलं.
आपल्या भीतीला आपणच मागे टाकू शकतो.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. त्या भीतीला गोंजारत बसलं तर तिचं चांगलं
पालन पोषण होतं आणि ती आपल्या वरचढ ठरते. हे होऊ द्यायचं नाही. आपला attitude आपली
दिशा ठरवतो. यातून जास्तीजास्त काय होईल तर मी हरणार... पण आपण न घाबरता
परिस्थितीला भिडलो हे तर स्वत:ला सांगता येईल.
एखादी गोष्ट करण्याच्या भीतीपेक्षा तसं केलं
तर कोण काय म्हणेल की एक common भीती जास्त असते. पण इथे सेहवाग चा attitude कामी
येतो. कारण १९५ वरून sixer मारताना out झाल्यावर जेव्हा त्याला विचारलं गेलं की
काही singles चं काम होतं sixer मारायलाच हवी होती असं नाही. तेव्हा सेहवाग
म्हणाला, “तसं नाही हो, माझी sixer फक्त ३ यार्डने हुकली असं म्हणा.” उत्तर देता
आलं पाहिजे. वाईटातून चांगलं पाहता आलं पाहिजे. चांगल्या अर्थाने attitude
महत्त्वाचा. लोक असं पण बोलतील, तसं पण बोलतील. आपण परिस्थिती कोणत्या चष्म्यातून
पाहतो हे महत्त्वाचं!
-
वरुण
भागवत
Khup Chan lihile aahes...
ReplyDeleteVarun 👌👍
शब्दमित्रा, फारच छान लिहिलंयस..
ReplyDeleteखूप सुंदर लेख ..
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteBeautiful message varun
ReplyDelete