Skip to main content

द्वेष

A click by: Varun Bhagwat

मिस्टर शर्मा या अनेक वर्षं corporate life चा अनुभव असणाऱ्या senior व्यक्तीशी आज समीर ची भेट झाली. या माणसाचा अनुभव नक्कीच खूप काही शिकवून जाणार होता. त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना भेटायला तो सहज wish करायला गेला होता. त्यांच्या घरून निघताना आपल्या घरी परततानाच्या प्रवासात तो झालेल्या चर्चेची उजळणी करत होता. समीर आता business विश्वात चांगला पाय रोवून होता. समीर च्या career च्या सुरुवातीलाच त्याची शर्मांशी भेट झाली होती आणि आता ते retired झाले होते. मात्र समीर न चुकता त्यांना birthday wish करायला जायचा. आजही तो गेला तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं,

“तू एकमेव आहेस, जो न विसरता प्रत्येक वाढदिवशी मला फक्त wish करण्यासाठी खास येतोस.”

“सर तुमचं आपलं काहीतरीच. तुमचे कितीतरी भक्त असतील.”

“आहेत ना. मित्र आहेत रे. . तू म्हणतोस तसे भक्त आहेत. पण या क्षेत्रात मित्र आणि आणि भक्तांसोबत शत्रू आणि द्वेष करणारे पण असतात.”

“ते आहेच. पण कोण असं किती द्वेष करू शकतं?”

“Do you want to know?”

“अर्थात. एक story तो बनती है!”

“खूप आधी वाचलेली गोष्ट; पण it makes sense.”

“सांगा ना.”

“एकदा ना दोन business मधले बादशाह एका बोटीतून प्रवास करत होते. Business चं field सारखं असल्याने अर्थातच competition तगडी. नुसती competition असेल तर ठीक आहे रे. पण हे दोघे एकमेकांचा द्वेष करायचे.”

“That is part and parcel.”

“एका limit पर्यंत ठीक आहे. पण यांचा hatred अतीच होता. ते त्या बोटीत असताना समुद्रात वादळ आलं. इतकं की सगळ्यांना जाणवलं की आता मरण अटळ आहे. हे असून सुद्धा त्यातला एक businessman त्या बोटीमधल्या समुद्राच्या जाणकाराला म्हणाला, “काय हो बोटीचा तिकडचा भाग आधी बुडेल की आपल्या इकडचा?” तो माणूस म्हणाला, “तिकडचा.” businessman म्हणाला, “मग ठीक आहे. मला मरण आलं तरी चालेल, पण माझ्या शत्रूचं मरण पाहण्यातला आनंद मला गमवायचा नाही. आधी तो मरेल मग मी.”

 

हा संवाद आठवताना समीर कधी घरी पोचला त्याला कळलं पण नाही. त्याला जाणवलं की मिस्टर शर्मा दोन businessmen ची गोष्ट करत होते त्यातला एक तो होता आणि दुसरा कुमार. समीर आणि कुमार कट्टर business rivals. त्या बोटीतल्या शत्रूसारखे. समीर चिंतन करत होता. त्याला जाणवत होतं, शर्मा हेच सांगायचा प्रयत्न करत होते की आपण गाळात असताना समोरचा आपल्याहून जास्त गाळात जात आहे हे पाहण्यात मजा येत असली तरी काही काळाने तीच वेळ आपल्यावर पण येणार आहे. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा आपण आपल्या business वर जास्त concentrate केलं पाहिजे असं तर शर्मा सुचवत नसावेत?

 

-वरुण भागवत

Comments

  1. Masta! Very true and apt for a corporate life.
    There's a saying that goes like this- "Be good to people on your way up. You'll need the same people on your way down. And coming down is guaranteed."

    Very nicely expressed! 👏👏

    ReplyDelete
  2. तुझे blogs वाचून म्हणावंसं वाटतंय, रोज एक story तो बनती हैं..

    ReplyDelete
  3. तुझे blogs वाचून म्हणावंसं वाटतंय, रोज एक story तो बनती हैं..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...