| A click by: Varun Bhagwat |
खेकडा हा जास्तीत जास्त समुद्रकिनारी आढळणारा
प्राणी. ३ खेकडे मित्र जमले. यातल्या दोघांना एकदा लहर आली दुसरीकडे जाण्याची. त्यांचा
जंगलाकडे जाण्याचा विचार झाला. तिकडे त्यांना भक्ष्य मिळवण्याच्या दृष्टीने बरंच
‘कुरण’ मिळेल असं जाणवलं. म्हणजेच तिकडे जास्त scope जास्त आहे अशी त्यांची धारणा
झाली.
एक मात्र त्यांच्याशी सहमत नव्हता. एवढा फायदा होऊ शकतो असं त्यांच्या बोलण्यातून वाटत असून सुद्धा त्याला काय वाटलं कोणास ठाऊक आणि तो म्हणाला, “तिकडे जाण्याच्या दृष्टीने त्या प्रभागाची संपूर्ण माहिती, ज्ञान, आपली तिथे टिकण्याची क्षमता आपण विचारात घेतली पाहिजे .आपण तिकडे टिकणार नाही. हे आपलं क्षेत्र आहे. आपण इथे जास्त प्रगती करू शकतो.”
दुसरा म्हणाला, “काय negative विचार आहेत
याचे.”
तिसरा म्हणाला, “नाहीतर काय, ह्याला नवीन
काही नकोच आहे.”
पहिला म्हणाला, “मला नवीन नकोय असं नाहीये.
पण ज्या क्षेत्रात मी बरं काम करतोय, अर्थात या समुद्रात, तिथे मी mastery मिळवेन
ना. माझ्या मते ही अविचारी रिस्क आहे.”
“ह्याला सोड. ह्याला तिथलं कुरण दिसत नाहीये.
तू मर इथेच.” असं म्हणून त्याला सोडून बाकी दोघांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळवला
सुद्धा. प्रवास अवघड होता. पण फायदा पाहून ते जात राहिले. काही काळाच्या प्रवासाने
ते तिकडे पोचले.
नवीन प्रदेशाचं नाविन्य होतंच. त्यामुळे
सुरुवातीला मजा येत होती. मात्र त्यांनी इथले धोके समजूनच घेतले नव्हते. निर्णयाचा
सारासार विचार झाला नव्हता. तिथे पोचताच काही कालावधी मजेत गेला मात्र नंतर एका
कोल्ह्याला यातल्या एका खेकड्याची विशेष मेजवानी प्राप्त झाली.
दुसरा खेकडा प्रचंड घाबरला. समुद्रकिनारी
खेकड्याला अनेक भक्ष्य मिळायची. त्याने हा विचार कधीच केला नव्हता की इकडे आपण पण
इतर कोणाचं भक्ष्य बनू शकतो.
माणसांना जसा एखाद्या क्षेत्रात जास्त scope
दिसतो, पैसा दिसतो आणि मग त्या दृष्टीने कल तिकडे वळतो आणि मग एकाच्या नादाने
बाकीचे जण तिकडे वळतात... बाकी विचार होत नाही. क्षेत्र निवडताना फक्त तिथला फायदा
बघून उपयोग नसतो. त्या जोडीने आपली तिथे टिकण्याची क्षमता, आपला आवाका, आपलं skill,
ज्ञान, आवड, तिथले धोके हे लक्षात घेणं गरजेचं असतं. तर आपण तिथे टिकतो.
हा घाबरलेला खेकडा परत त्याच्या जुन्या जागी
परतला. त्याच्या मित्राला भेटला. त्याला पूर्ण हकीकत सांगितली.
इथे असणारा खेकडा म्हणाला, “अरे पण तिकडे
बराच scope आहे ना?”
“प्रश्न scope चा नाही. पण तुझं म्हणणं योग्य
आहे. स्वतःचे skills समजून न घेता घेतलेला अविचारी निर्णय ‘अर्थ’पूर्ण असेलच असं
नाही. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि क्षेत्र निवडलं पाहिजे.” आणि म्हणाला,
“Sorry. Can I join you?”
“विचारायचं काय त्यात? समुद्र आपलाच आहे.
welcome back.”
-
वरुण
भागवत
-
Aajachya images ne tar ajunach maja aanali
ReplyDeleteअर्थावरील खरच अर्थपूर्ण लेखन
ReplyDeleteGood thinking and attitude also
ReplyDeleteGood thoughts and valuable thanking
ReplyDelete👌👍🙋
Mast re
ReplyDelete'अर्थ'पूर्ण लेखन..
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete