![]() |
| A Click by: Varun Bhagwat |
“ताई कोण लागून गेली आहे ही?”
“अगं प्रिया काय झालं?”
“ताई कशी बोलली ती मला!!!”
“कोण?”
“अगं ती मीना जिला मी report करते ती.”
“प्रिया, तुझा job नवीन आहे, तू तर नाही ना
काही घोळ घातलायस?”
“नाही गं ताई. उलट माझा job नवीन आहे म्हणूनच
ती असं वागतीये.”
“म्हणजे? मला नीट सांग.”
“ताई अगं तुला मीना आठवते का जी माझ्याच
batch ला होती. Just because माझ्या आजारपणामुळे
माझं १ वर्षं वाया गेलं आणि ती माझ्या पुढे गेली. त्यात आता योगायोग असा की आम्ही
एकाच कंपनीत एक वर्षाच्या फरकाने लागलो. तो एक वर्षाचा फरक महागात जातोय.”
“प्रिया आज काय नेमकं घडलं ते सांग.”
“मीना... sorry sorry... मीना madam आमची
morning meeting घेत होत्या. एक point मी मांडत होते तेव्हा मी तिला first name ने
mention केलं. I mean ‘मीना’ असं म्हणाले. तर माझा point राहिला बाजूला, ती मला
सगळ्यांसमोर म्हणाली की मला madam म्हणायचं बरं का! Senior आहे मी तुझी.”
“मग बरोबर आहे ना..”
“काय बरोबर आहे? ताई तुलाही माहितीये एका
semester मध्ये तर ही फक्त माझ्या notes वर अभ्यास करून pass झालीये. आम्ही बरे वागायचो
एकमेकांशी college मध्ये. आता हा कसला माज आहे हिला?”
ताई फक्त हसली.
“ताई तुला हसायला येतंय? हे बघ तिला madam
म्हणणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. पण मला तिची पद्धत नाही पटली. मला आश्चर्य
वाटतं की अशी कशी माणसं बदलतात?”
“Position बेटा... थोडी वरची position मिळाली
की काही माणसांना वाटतं आपणच सर्वश्रेष्ठ. तुला माहितीये का एका छोट्या सशाला गावाबाहेर
आणि जंगलाजवळ असणाऱ्या पडक्या घराच्या छतावर जाण्याचा मार्ग सापडला होता. तो त्या ‘Position’
वर असल्याने खालून जाणाऱ्यांना फार कमी लेखत असे. एकदा एक वाघ खालून जात होता. वाघाचा
आज चांगला mood होता. तो सशाला म्हणाला “काय
रे ससुल्या, बरं चाललंय ना?” त्यावर ससा चिडून म्हणाला, “ए वाघ्या, ससे भाऊ
म्हणायचं आपल्याला.”
“तो त्याला वाघ्या म्हणाला?? मग वाघाने काय
केलं?”
“वाघ फक्त हसून निघून गेला.”
“आईशप्पथ!! असं कसं? तो काही बोलला नाही.”
“मोठी माणसं बोलत नाहीत. करून दाखवतात. तू ही
त्या ससुलीला काही बोलू नकोस.”
“ससुली?”
“अगं म्हणजे तुझी मीना madam. तिला काही बोलू
नकोस.”
“ह्याला काय अर्थ आहे? त्या वाघाने तरी असं
का सोडून द्यावं?”
“वेळ प्रत्येकाची येते. वाघाची पण वेळ आली.
त्या छतावर किती दिवस बसेल ससा? खाली यावंच लागलं. एक दिवस सापडला वाघाच्या हाती.”
“मग वाघाने केली का शिकार? घेतला का बदला?
चांगली संधी मिळाली होती.”
“नाही बाळा. वाघाने बदल्याच्या पुढची step
घेतली.”
“म्हणजे?”
“वाघाने सश्याला पकडलं. ससा घाबरून म्हणाला
वाघ साहेब मला please सोडून द्या. वाघ म्हणाला की माझी ध्येय मोठी आहेत. तुझ्यासारख्यांच्या
नादी लागून मला माझी energy घालवायची इच्छा नाही.”
“असं म्हणाला तो?”
“हं... एक दिवस येईल. तू मीनाच्या पुढे
जाशील. तू किती sharp आहेस मला माहितीये.”
“मग पुढे गेल्यावर त्या वाघासारखं तिला बोलू?”
“बोलायची गरज पडणार नाही.”
“काहीतरी बोलू दे की.”
“गरज नाही. तुझी position तिला जागेवर आणेल.”
“हे solid आहे.”
“पण म्हणून तू तिच्याशी वाईट वागायचं नाही.
नाहीतर तुझ्यात आणि तिच्यात फरक काय? आता ती मीना सगळ्यांसमोर तुला बोलली यामुळे
तीच बाकीच्यांच्या पण नजरेतून उतरली की नाही? Position मिळाली तरी वापरता आली
पाहिजे. तर तिचं महत्त्व टिकतं.”
-वरुण भागवत

True and nice
ReplyDeleteRight 👍
ReplyDeleteलाजवाब
ReplyDeleteKhup Chan🙋👌👌👍👍👍
ReplyDeleteThank you everyone
ReplyDelete