| A click by: Varun Bhagwat |
“त्याने स्वत: इथे या company मध्ये काम
केलं. त्याला आपण सगळं दिलं यार...”
“झालं काय?”
“आपण जे मार्केट मध्ये नवीन product launch
करणार होतो त्याची तारीख पण आपण पक्की केली होती.”
“Yes. Right.”
“त्याचं presentation त्याने केलं आणि पूर्ण
credit लाटलं.”
“How come?”
“Product बनवायचा formula ज्या core team ला
माहित होता, त्या core team मधला हा एक member.”
“हो बरोबर.”
“आपल्या launch ची date ठरली आणि
strategically he resigned. He joined our rival firm. त्याने असंच्या असं product
बनवलं फक्त थोडेसे बदल करून... आणि presentation दिलं and now त्यांचं launching
almost ready आहे. त्यांनी advertise पण दिली.”
“आपलं पण product आहे ना?”
“हो पण launch कुठे झालंय. Ad कुठे आहे? दिसताना
असं दिसणार की आपण यांचं product चोरलं. कारण आपली अजून advertise नाही. म्हणजे
त्यांनी आधी ad केल्यामुळे लोकांच्या दृष्टीने ते त्यांचं product होणार. थोडा
formula change करून त्याने तिकडे बनवल्याने बाकी patent चा पण विषय नाही.”
“आपण launch का नाही केलं पण आधी?”
“तो project थोडा back burner वर गेला आणि...
ते थोडं मागे पडलं..”
“आणि त्याने फायदा घेतला.”
“So unprofessional.”
“ज्याच्या हाती ससा त्याचाच ठसा.”
“काय?”
“आपण गोष्टी वाचल्या पण बोध नाही घेतला.”
“नीट सांग काय म्हणायचं आहे तुला ते.”
“अरे, एक राजा होता. त्याने फर्मान काढलं की
जो त्याच्यासाठी सश्याची शिकार करेल आणि त्याला आणून देईल त्याला बक्षीस. सगळे
कामाला लागले. रामूने शिकारीत यश मिळवलं. तो जंगलातून मोठ्या खुशीत शिकार घेऊन येऊ लागला. त्याला वाटलं आपणच पहिली
शिकार करण्यात यशस्वी झालोय. लवकरच राजाला खुश करूया. तो भराभर पावलं टाकू लागला.
तेवढ्यात बाळूने त्याला गाठलं. त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यात धूळ फेकली. पटकन
रामूने मारलेला ससा हिसकावून घेतला. बाळू दरबाराच्या दिशेने पळू लागला. रामू
भानावर येईपर्यंत हा बाळू दरबारात पोचला सुद्धा. रामू डोळे चोळत दरबारात पोचला.
तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झाला होता.”
“पण, रामूची बाजू सत्याची होती. तो काही
बोलला नाही?”
“सत्य काय आहे...? जे समोर दिसतं या पेक्षाही जे दाखवलं जातं.
बाळूच्या हातात ससा दिसत असताना रामू तिथे काही बोलला असता तरी उलट त्यालाच शिक्षा
झाली असती.”
“म्हणजे कौशल्य वापरणाऱ्यापेक्षा डावपेच
करणारे सरस ठरणार तर?”
“दुनियादारी मित्रा.”
“आपल्यासारख्याने काय करायचं?”
“आपण पण असं वाईट वागायचं?”
“आपली तशी नियत नाही.”
“असं करताना त्यांना काही वाटत नाही.”
“हा वाद घालण्यात काहीच point नाही.”
“मग?”
“अनुभवाने तरी शहाणं व्हायचं. वेळच्या वेळी
अशा लोकांना ओळखायचं... या पेक्षा सुद्धा कोणाला किती काय सांगायचं आणि दाखवायचं
ते आपण ठरवायचं. थेट results दिसले आणि एकदा गोष्ट बाजारात आली की मग formula open
केला तरी आपल्याला फार फरक पडत नाही. पण एरवी...”
“एरवी काय?”
“एरवी काय.... जरा जपून...”
“खरं आहे...”
“असू दे. तू नको नाराज होऊस. एकदा चोरतील आणि भोगतील सुद्धा... पण
तुझ्यात कौशल्याची कमी आहे का? आपण करत राहू.”
-
वरुण
भागवत
👍👍👍
ReplyDelete👌
ReplyDeleteKhara e...masta👌👌👌
ReplyDelete