शाळेमध्ये आज सर मुलांशी अनौपचारिक गप्पा मारत होते.
सर म्हणाले, “कल्पना करा, तुम्ही रस्त्यातून चालत जाताय...
रस्त्यामध्ये मोठ्ठा दगड ठेऊन दिला आहे. तुमचं लक्ष कुठे जाईल?”
एक मुलगा खोडीलपणे म्हणाला, “दगड ठेवणाऱ्या माणसाला शोध घेण्याकडे
लक्ष जाईल.”
सर हसले आणि बोलले, “छान. पण गंमत सोडा. काय दिसेल सांगा पाहू?”
मुलं म्हणाली, “दगड.”
“आज अमितच्या शर्टवर डाग पडला होता. मुलांनो त्याच्याकडे पाहताच
तुमचं लक्ष कुठे गेलं?”
“सर, डागाकडे.”
“उदाहरणं, प्रसंग अनेक आहेत. सगळी गंमत इकडेच आहे. म्हटलं तर दगडापेक्षा
रस्ता मोठा आहे. रस्ता दिसायला हवा. पण दिसतो दगड. इतका सुंदर शर्ट अंगावरती आहे,
डागापेक्षा शर्ट मोठा आहे. पण लक्ष डागाकडे जातं.”
“सर असा दगड दिसला की काढला पाहिजे ना..”
“बरोबर... दगड म्हणजे अडचण. आपण ती दूर करावी. स्वत:ला आणि लोकांनाही
फायदा होतो.”
तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला, “पण सर कधीकधी तो दगड उचलणं अशक्य
असतं... अर्थात खूप मोठी अडचण असते जी स्वत: तिथून हलायला तयार नसते. आपण तिथे
काहीच करू शकत नसतो. मग करायचं....???”
सर म्हणाले, “अरे वा... तुम्ही मुलं इतका छान विचार करू लागलायत हे
माझ्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे. हां, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की
मग अडचण हलणार नसेल तर gap काढता आली पाहिजे.”
“म्हणजे?”
“मुलांनो, तुम्हाला Ricky Ponting माहित आहे?”
“Australia चा माजी कर्णधार.”
“Yes. जरी तो भारत देशाचा नसला तरी त्याच्या खेळातून आणि विचारातून
शिकण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.”
“ती कोणती सर?”
“फार कमी खेळाडू test cricket मध्ये १३००० धावांचा टप्पा गाठू शकले.
त्यामधला एक म्हणजे Ponting. या यशामागचं रहस्य विचारताच तो जे म्हणाला ते विचार
करायला लावणारं आहे.”
“काय म्हणाला सर तो?”
“त्याला विचारलं गेलं की इतक्या धावा कशा करू शकलास बाबा? तर तो
म्हणाला की शक्यतो सगळे जण batting करताना एकदा fielding कशी लावली आहे ते बघून
ठेवतात. पण असं केल्याने अडचण अशी होते की डोक्यात fielders कुठे आहेत हे fit
होतं. पण मी मात्र gaps बघून ठेवतो. माझ्या डोक्यात मैदानावर चेंडू अडवणारे ११ जण
येत नाहीत. तर त्याहून अधिक gaps मला दिसतात.”
“सर भारीच आहे हे.”
“नुसतं भारी म्हणून चालायचं नाही. आपण एखाद्या अडचणीकडे कसं बघतो हे
महत्त्वाचं. पुन्हा Ricky च्या भाषेत बोलायचं तर तो अडचण बघत नाही संधी बघतो. Gaps
शोधता आल्या पाहिजेत. कितीही fielders चं जाळं लावलं तरी आपल्या देशाच्या सौरव
गांगुलीला सुद्धा off side मधून gap काढायला कधीच अडचण आली नाही. याला म्हणायचं
अडचणीमधून संधी शोधत राहणं. मग चेंडू बरोबर boundary पार करतो.”
- वरुण भागवत
sundar
ReplyDelete1 no....
ReplyDeleteKhupch mast....
अप्रतिम उदाहरण आणि येणाऱ्या अडचणीला/संकटाला कसं सामोरं जायचं हे व्यवस्थित मांडलंय
ReplyDelete