Skip to main content

Attitude वाला चष्मा

A Click by: Varun Bhagwat


तुम्हाला वीरेंद्र सेहवाग माहितीये?

वीरेंद्र सेहवाग उर्फ ‘वीरू’ म्हणजे भारताचा एके काळचा उत्तम opening batsman.

त्याला तुम्ही batting करताना पाहिलंय?

अनेकांनी त्याला batting करताना पाहिलं असेल. पण आता महत्त्वाचा प्रश्न. त्याला तुम्ही batting करताना ऐकलंय? ऐकलं नसेल तर नक्की ऐका. त्याचं कारण सुद्धा तसं आहे.

काम करण्याची ज्याची त्याची पद्धत असते. काम enjoy करण्याची सुद्धा ज्याची त्याची पद्धत असते. काहींना गाणी ऐकत काम करायची सवय असते. काही जणांना गाणी गात काम करण्याची सवय असते. आता मुद्दाम गाण्याबद्दल बोलतोय कारण वीरू गाणी गात batting करायचा. गाणी गात sixers सुद्धा मारायचा. आपला कामामधील attitude खूप matter करतो.

एक किस्सा... सेहवाग २९५ runs वर batting करत होता. ही match २००४ साली मुलतान येथे चालू होती. या आधी २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात वीरू १९५ runs वर असताना sixer मारायला गेला आणि out झाला होता. तेव्हा तो त्याच्या २०० धावांचा landmark तो गाठू शकला नव्हता..

या वेळी तर mile stone अजून मोठा होता. पाकिस्तान विरुद्ध २९५ वर असणाऱ्या वीरूला ५ एकेरी धावा अर्थात 5 singles काढून ३०० करणं शक्य होतं. पण मग तो वीरू नसता वाटला. त्याने चेंडू पडल्यावर पाय पुढे टाकला आणि अशा पद्धतीत bat फिरवली की ball थेट प्रेक्षकांमध्ये... पहिल्यांदा ३०० धावा करणारा भारतीय म्हणून त्याचं नाव कोरलं गेलं.    

 

भीती आपल्याला यशापासून मागे तरी खेचते किंवा थोडा safe game खेळायला सांगते. पण कधी न कधी या safe zone पासून comfort पासून बाहेर येऊन एखादी sixer मारावीच लागते. एखादी परिस्थिती जेव्हा आपल्या समोर उभी ठाकते तेव्हा आपण पूर्वीचा तशा पद्धतीचा प्रंसग आठवतो आणि आपली त्या वेळेला झालेली हार आठवतो आणि रिस्क घ्यायला बिचकतो. मात्र वीरू इकडेच जिंकला. त्याने स्वतःच्याच भीतीला सणसणीत sixer ने उत्तर लगावलं.

 

आपल्या भीतीला आपणच मागे टाकू शकतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. त्या भीतीला गोंजारत बसलं तर तिचं चांगलं पालन पोषण होतं आणि ती आपल्या वरचढ ठरते. हे होऊ द्यायचं नाही. आपला attitude आपली दिशा ठरवतो. यातून जास्तीजास्त काय होईल तर मी हरणार... पण आपण न घाबरता परिस्थितीला भिडलो हे तर स्वत:ला सांगता येईल.

एखादी गोष्ट करण्याच्या भीतीपेक्षा तसं केलं तर कोण काय म्हणेल की एक common भीती जास्त असते. पण इथे सेहवाग चा attitude कामी येतो. कारण १९५ वरून sixer मारताना out झाल्यावर जेव्हा त्याला विचारलं गेलं की काही singles चं काम होतं sixer मारायलाच हवी होती असं नाही. तेव्हा सेहवाग म्हणाला, “तसं नाही हो, माझी sixer फक्त ३ यार्डने हुकली असं म्हणा.” उत्तर देता आलं पाहिजे. वाईटातून चांगलं पाहता आलं पाहिजे. चांगल्या अर्थाने attitude महत्त्वाचा. लोक असं पण बोलतील, तसं पण बोलतील. आपण परिस्थिती कोणत्या चष्म्यातून पाहतो हे महत्त्वाचं!

 

-       वरुण भागवत



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...