Skip to main content

तरी तू चालत रहा...


Photo Courtesy- Poonam Godse


“सर, अशी एक वेळ येऊ लागलीये जेव्हा वाटतंय की मी इतकं काही करतोय त्याचा काही उपयोगच नाही. काहीच छान घडतंय असं वाटत नाही. उदास व्हायला होतंय. माझं लक्ष्य खूप दूर चाललंय असं वाटतंय.” २२ वर्षांचा सुजय आपल्या सरांना विचारत होता. प्रश्नाचा रोख आपल्याला कळलाच नाही असं भासवत सर म्हणाले, “नेमकं काय म्हणायचं आहे तुला?”

“सर, तुम्हाला तर माहितीच आहे की अनेक जणांचा विरोध पत्करून मी मला हवं असणारं field निवडलंय. मी वाट शोधतोय, अजून मिळत नाहीये. पण मध्येच दुष्ट स्वप्न पडतं आणि त्यात मध्येच एकदम खोल खड्ड्यात पडल्यासारखं वाटतं. वरती पाहतो तर सगळ्यांच्या नजरा सांगत असतात की आम्ही म्हणालो होतो की शक्य नाहीये तुला हे... मग मला खूप मागे खेचलं गेल्यासारखं वाटतं.”

सर बारीकसं हसले.

“सर, अहो तुम्ही तरी हसू नका.”  रडवेल्या स्वरात सुजय म्हणाला.

सर एकदम समजुतीच्या स्वरात म्हणाले, “अरे बेटा तुला नाही हसत आहे मी. तू खड्ड्यात पडल्याचं म्हणालास त्यावरून काहीतरी connect झालं.”

“काय?” उत्सुकतेने सुजय म्हणाला.

“खोल विहिरीत पडलेल्या बेडकांची गोष्ट आठवली.” सर आठवल्यासारखं म्हणाले.

“सांगा ना.” सुजयची उत्सुकता वाढली.

सर सांगू लागले, “दोन बेडूक असेच काहीतरी तुझ्यासारखं वेगळं शोधत असताना त्यांच्याच नकळत एका खोल विहिरीत पडले. अशा वाटेवर चालताना आधी कोणी जवळ आणि सोबत नव्हतं. पण ते पडल्याचं कळताच इतर अनेक बेडूक जमले. तुला जसं खड्ड्यात पडल्यावर जाणवतं तशाच काहीशा नजरा या काठावरल्या बेडकांच्या होत्या. त्यांच्या नुसत्या नजराच नव्हत्या तर ते ओरडून सांगत होते की सोडून द्या प्रयत्न... तुम्हाला बाहेर येणं शक्य नाही.”

“त्यांना वाचवायला कोणी आलं नाही?” सुजय तोडत म्हणाला.

“अशा प्रसंगी बघ्यांची संख्या जास्त असते. कोणी आपल्याला आपलं मानणारं असेल तर ठीक. नाहीतर आपला आपल्यालाच मार्ग काढावा लागतो. पण बेडकांच्या सततच्या नकारात्मक बडबडीमुळे त्या दोघांतल्या एका बेडकाने त्यांचं ऐकायचं ठरवलं. त्याने प्रयत्न सोडून दिले. तो प्राणाला मुकला. दुसरा बेडूक मात्र हार मानेना. काठावरचे बेडूक ओरडत होते आणि हातवारे सुद्धा करत होते. हा बेडूक प्रयत्न सोडतच नव्हता. त्याने सातत्य ठेवलं... वरचे बेडूक त्याला म्हणत होते, “जीवाचे हाल करून मरण्यापेक्षा सोडून दे.” तो मात्र प्रयत्न करत राहिला. एक वेळ आली आणि तो शेवटी बाहेर येण्यात यशस्वी झाला. सगळ्या बेडकांना आश्चर्य वाटलं. ते तिथे सुद्धा म्हणत राहिले, “आम्ही तुला इतकं बोलून सुद्धा तू का बरं प्रयत्न करत राहिलास. “ तरी बेडूक उत्तर देईना. तो खुशीत दिसला. बाकी बेडकांना काही कळेना. मग थोड्या वेळाने असा खुलासा झाला की ह्या बेडकाला काही ऐकूच येत नाही. त्यामुळे वरचे बेडूक जे त्याला खच्ची करायचा प्रयत्न करत होते ते त्याला ऐकूच आलं नाही. उलटपक्षी त्यांचे हातवारे पाहून त्याची अशी समजूत झाली की हे सगळे त्याला वरती यायला आणि त्यातून बाहेर पडायला प्रोत्साहित करत आहेत.”

सुजय काही क्षण सरांकडे पाहतच राहिला.

सर पुढे म्हणाले, “तुला कोण काय बोलतं या पेक्षा तू ते कसं घेतोस हे महत्त्वाचं आहे. मग बघ, स्वप्नात पुन्हा खड्डा आला तरी त्यातून बाहेर येणं तुझ्यासाठी भीती नसून एक आव्हान असेल. तू चालत रहा.”

 

-वरुण भागवत


  


Comments

  1. असाच चालत रहा ... 👍

    ReplyDelete
  2. व्वा... धन्यवाद.

    ReplyDelete
  3. Waa!
    Very interesting and sportly motivation... 👌👌👍👍

    ReplyDelete
  4. खरंच छान गोष्ट, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर सर्वच निभावून जातं

    ReplyDelete
  5. Masta connect kela...👌👌👌

    ReplyDelete
  6. व्वा, अतिशय प्रेरक.. मनाला नवी उमेद देणारं लेखन आहे.. असाच लिहीत राहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...