Skip to main content

कामं...

A Click by: Varun Bhagwat


अमन कामाला आला आणि आल्या आल्या त्याची रजतशी गाठ पडली. दोघे एकाच department मध्ये होते. Office च्या main gate पासून आत department पर्यंत पोचायला ५-१० मिनिटे लागत.

 “बरा भेटलास इथेच. आत्ता जे मी बोलणारे ते आत नाही बोलता येणार.”

“का? काय झालं?”

“अमन, असा कसा रे तू? मला तुझं एक कळत नाही. आपल्याला office मध्ये इतकी कामं असतात तरी त्यात तुला दुसऱ्यांची कामं करायची किती हौस!”

“त्याला काय होतं? अशी काय मोठी गोष्ट असते त्यात?”

“हे बघ तुझ्यासारखा इतका साधा विचार करत नाहीत बाकीचे.”

“पण माझी अपेक्षा पण नाहीये त्यांनी असा विचार करावा अशी.”

"पण त्या कामाचा काही तुला जास्त पगार मिळतो का?”

“नाही रे रजत.”

“मग कशाला? कोणी त्याची परतफेड पण करत नाही तर तुला काय पडलेली असते त्यांची?”

“माणसंच माणसांच्या उपयोगी पडतात.”

“पण परतफेडीचं काय?”

“सारखे हिशोब कशाला मांडायचे?”

“मी मांडतो बुवा आणि परवा मी वाचलेल्या एका गोष्टीने ते prove पण झालंय.”

“कोणत्या गोष्टी वाचत बसतोस बाबा तू रजत?”

“बैलजोडी मधला एक बैल आजारी पडला. मग शेतकऱ्याने आपल्या मालवाहू गाढवाला बैलगाडीला दुसऱ्या बैलासोबत जुंपलं. दिवसभर शेत नांगरल्यावर दोघे थकले. बैल म्हणाला, “दमलो बुवा.” गाढव म्हणालं, “हो ना. आता मालकाचं ओझं वाहून न्यायचं काम पण दोघं मिळून करून.” यावर बैल जबाबदारी झटकत म्हणाला, “ए, ते तुझं काम आहे. माझं नाही.” रजत पुढे बोलला, “कळलं का काही? अशी उपयोग करून घेतात माणसं! तू कर त्या गाढवासारखी इतरांची कामं. तुझं reward काय तर तुझं काम पण तूच कर आणि त्यांचं सुद्धा.”

“रजत, शांत हो. तू कशाला चिडचिडला आहेस? सगळी माणसं त्या बैलासारखी नसतात.”

“पण सगळे चांगले सुद्धा नसतात. मग आपण गाढव ठरतो.”

“मी तुझं म्हणणं अमान्य करत नाही. पण कोणाला मदत लागत असेल तर मी ती मदत करणं नाकारत सुद्धा नाही.”

“ते तुझा उपयोग करून घेत असले तरी?”

“असं नाहीये.”

“असंच आहे. ते त्या बैलासारखे तुझ्याशी वागलेले आपल्याला आवडत नाही.”

 “बरं, करू देत उपयोग. असा विचार कर की मग कधीतरी त्या बैलावर सुद्धा वेळ येईल.”

“अशी कशी येईल?”

“मला ते गाढव म्हणतो आहेस ना तू.”

“तसं नाही रे.”

“नाही उदाहरणादाखल मी ते गाढवच आहे तुझ्या गोष्टीतलं असं समज! मग आता या गोष्टीत पुढे काय होतं माहितीये?”

“काय?”

“त्या दिवशीच्या अतीश्रमाने गाढव आजारी पडतं. दुसरा बैल आजारी असतोच. मग शेत नांगरायची पूर्ण जबाबदारी या एकट्या बैलावर येते आणि ओझं वाहायची सुद्धा. मग बैलाला चूक समजते आणि गाढव आणि बैल मित्र होतात.”

“वा वा वा वा... happy ending. पण मग तुझ्या आजारी होण्याची वाट पाहायची का या बैलांनी. अरे तो सतीश... या बैलांपैकीच.. इतक्यातच join केलंय त्याने. किती घाबरला होता. काय त्याचा report होता. तू नीट करून दिला तेव्हा कुठे तो madam ना दाखवण्याजोगा झाला. पण त्याचं काम उरकलं आणि सालं साधं thank you पण नाही.”

“दुसऱ्याचं चांगलं केल्याने आपलं वाईट होत नाही इतकं मला कळतं.”

“पण सगळे तसे नसतात. फायदा घेणारे पण असतात.

“असे लोक तू ओळखतोस.”

“प्रश्नच नाही.”

 “बरं रजत ऐकतो तुझं. हे बघ, कोणी मला एखादं काम देत असेल ना.. आपलं नेहमीचं काम सोडून... तर डोळा मारून सांगत जा यांचं काम घ्यायचं की नाही. उजवा मारलास तर घेणार आणि डावा मारलास तर नाही घेणार. Done?”

“मी तर सतत डावा डोळा मारत राहीन.” रजत हसत म्हणाला.

अमन दिलखुलास हसला.  Department चा दरवाजा उघडून ते आत गेले. अमनच्या टेबल वर एक ‘Thank you’ card होतं. अमनने उघडून पाहिलं- आत लिहीलं होतं- माझ्या report मधले points presentable पद्धतीत मांडून तुम्ही तो एकदम clean बनवलात. Madam खुश झाल्या. आज जाणवलं की माझे reports चुकत नव्हते. त्यात माझी expertise आहे. पण ते मांडण्याची पद्धत तुम्ही शिकवलीत. आता माझ्यासाठी ते काम एक reference म्हणून राहील. Thank you again. सामोसा party करू तुम्हाला जमेल तेव्हा.” – सतीश.

रजत ने पण हे वाचलं होतं. हाच तो सतीश ज्याला रजत काही वेळापूर्वी बैल म्हणाला होता. अमन आणि रजत ने एकमेकांकडे पाहिलं. रजत ने दोन्ही डोळे मिचकावले.

अमन confused होत म्हणाला, “हे काय? उजवा मारला तर काम घ्यायचं. डावा मारला तर नाही असं ठरलंय ना. दोन्ही का मारलेस?”

रजत शांतपणे म्हणाला, “दोन्ही डोळे मारले कारण तू ठरव कोणाचं काम घ्यायचं आणि कोणाचं नाही ते. कारण माणसांची पारख माझ्यापेक्षा तुला जास्त आहे.”

 

-       वरुण भागवत

- 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...