Skip to main content

संगत

A click by: Varun Bhagwat



भाऊ आणि नाना लहानपणापासूनचे मित्र. आज २० वर्षांनी त्यांची गाठ पडली. दोघे साठीच्या उंबरठ्यावर होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांच्या गप्पांनी थोडं वेगळं वळण घेतलं. नाना बोलता बोलता म्हणाले,

“अरे त्या आपल्या अप्पाचा काही contact नाही.”

“नाही तेच बरंय.” भाऊ बोलून गेले.

 “असं का बरं?” नानांनी विचारलं.

“अप्पाचं वाईट वाटतं. पण काय करणार?” भाऊ म्हणाले.

“मला नीट सांगशील?”

भाऊ सांगू लागले,  “नाना, त्या अप्पाच्या पोरांमध्ये काय जमीन- अस्मानाचा फरक आहे. त्याची पोरं संजू आणि विजू. सख्खे भाऊ. पण संजू इतका गुणी आणि विजू मात्र गुन्हेगारी मार्गाला लागला.”

“होय?”

“हो  ना.  तसा माझा पण contact नव्हता. पण इतक्यात समजलं. नाना, हे असं घडू शकतं? दोन सख्खे भाऊ आणि इतका फरक?”

“घडू शकतं भाऊ.”

“कसं?”

“जसं दोन पोपटांच्या बाबतीत घडू शकतं तसं संजू-विजूच्या बाबतीत पण घडू शकतं.”

“पोपट कुठून आले नाना?”

“अरे तुला ती पोपटाची गोष्ट आठवते का?”

“कोणती रे?”

“एका पोपट विकणाऱ्या माणसाने एका शेठजीला दोन पोपट विकले. एकाची किंमत ५ रुपये आणि दुसऱ्याची १०० रुपये. शेठजीला किमतीतला फरक पाहून धक्काच बसला. पण पोपट विकणारा मनुष्य म्हणाला, “विश्वास ठेवा. मी उगाच नाही विकत आहे असं.” शेठजीने पैशाचा फार विचार न करता दोन्ही पोपट विकत घेतले. १०० रुपयाचा पोपट त्याने स्वतःच्या खोलीत ठेवला. ५ रुपयाचा पोपट त्याने hall मध्ये ठेवला. शेठजी झोपून गेला. दुसऱ्या दिवशीची शेठ्जीची सकाळ त्या खोलीतल्या पोपटाच्या गाण्याने झाली. त्याने छानपैकी शेठजीचं मनोरंजन केलं. शेठजी hall मध्ये ५ रुपयाच्या पोपटापाशी आला. तो पोपट काहीच बोलेना. शेठ्जीला वाटलं हा काही बोलत नाही म्हणून याची किंमत कमी असावी. शेठ्जीने दोघांना खायला पेरू आणि मिरची दिली. १०० रुपयाच्या पोपटाने आवडीने ते खाल्लं. मिरची थोडी तिखट लागली हे ही त्याने स्पष्ट सांगितलं. ५ रुपयाच्या पोपटाने ते खाल्लं आणि तिखट लागताच तो अतीशय घाणेरड्या शिव्या घालू लागला. शेठजीला आता मात्र त्याचे खरे रंग आणि किंमत कळली.”

“नाना पण संजू-विजू सख्खे भाऊ.”

“ऐक रे. गोष्ट संपली नाहीये. काही दिवसांनी शेठजीची पोपट विकणाऱ्या माणसाशी गाठ पडली. तो म्हणाला, शेठजी कळलं त्यांच्या किमतीत इतका फरक का ते?” यावर शेठजी म्हणाले, “पण असं कसं?” पोपट विकणारा हसून सांगू लागला, “खरंतर हे दोन पोपट सख्खे भाऊ. पण यातला एक जण या आधी अशा माणसाकडे होता जो सज्जन होता. उत्तम बोलायचा, छान गायचा. त्याची संगत याला लाभली; पण दुसरा मात्र अशा ठिकाणी होता जो घरच्या व्यक्तींनाच शिव्या द्यायचा. वाईट वागायचा. म्हणून हे असे झाले.”  

“संगतीचा इतका परिणाम नाना?” भाऊ विचारत होते.

“हं... म्हणून तुला मगाशी म्हणालो, जसं दोन पोपटांच्या बाबतीत घडू शकतं तसं संजू-विजूच्या बाबतीत पण घडू शकतं... फक्त संगतीमुळे.”

 

-       वरुण भागवत

Comments

  1. As usual khup sundar lihilai 🥁

    ReplyDelete
  2. who said this
    1. Give me a child I will make his anything!
    2.It is not heredity or environment but heredity and environment influence human development !

    ReplyDelete
  3. आपण चांगल्या लोकांचीच संगत धरुया.छान गोष्ट वरूण.

    ReplyDelete
  4. सुसंगती सदा घडो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...