Skip to main content

संधी

A Click by: Varun Bhagwat

“मला ना या हिंदी सिनेमातल्या काही काही scenes ची गंमत वाटते.”

“तसे बरेच scene गमतीदारच असतात. तुला कोणत्या scenes ची गंमत वाटते?”

“कोणीतरी काहीतरी गुन्हा करतं आणि ते नेमकं एका सज्जन माणसाला दिसतं आणि तो ओरडून तिथे सांगतो की अब ये सब मै पुलिस को जा के बताउंगा. मग तो गुन्हेगार याला पण मारून टाकतो. आता जे काम करायचं आहे ते करून टाकायचं ना... हे सांगत बसून कशाला मरायचं?”

“हाहा... खरंय.. आणि या उलट अजून एक म्हणजे अनेकदा villain च्या हाती hero सापडलेला असतो पण villain इकडच्या तिकडच्या गप्पा हाणत बसतो आणि त्या नादात hero ला बरोबर chance मिळतो.”

“हो... पण हे लहानपणापासून असंच चालत आलंय. त्या एका गोष्टीमध्ये नाही का एक बकऱ्यांचा कळप चाललेला होता. त्यातलं एक कोकरू अर्थात छोटं पिल्लू मागे पडलं.. सोबत राखण करायला कुत्रे होते पण नेमकं ते मागे पडलं. नुसतं मागेच नाही पडलं तर थोडं भरकटलं सुद्धा. ते पिल्लू बरोबर एका लांडग्याच्या हाती सापडलं. या पिल्लाला कळून चुकलं की आता आपली काही खैर नाही. पण ते दिसायला इटुकलं असलं तरी फार हुशार होतं. बरं त्या हिंदी फिल्म मधल्या villain सारखी या लांडग्याला पण हौस... आता काही गरज आहे का खरं पण तरी त्याला थाटात त्याने विचारलं- “कोई आखरी ख्वाहिश?” पिल्लाला हीच संधी वाटली असावी. ते म्हणालं मी नाच फार सुंदर करतो. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही गा आणि मी नाचतो. तुमचा गळा फार गोड आहे. लांडगा हे ऐकून फार खुश झाला. तो गाणं गाऊ लागला. पिल्लू नाचू लागलं. काही मिनिटातच  कळपाची राखण करणारे कुत्रे गाण्याच्या आवाजाच्या दिशेने पिल्लापर्यंत पोचले. इतके कुत्रे येतायत हे पाहून लांडग्याला पळण्याशिवाय पर्याय उरला नाही.”

“थोडक्यात story चा hero वाचला.”

“Yes.”

“पण मी काय म्हणतो हा मूर्ख लांडगा गाणं गात बसला नसता तर...”

“तर तो पिल्लाचा फडशा पाडू शकला असता.”

“ह्यातून आपण काय शिकायचं तर timing is important. ज्याला हे timing चं गणित कळलं तो hero.”

“अनेकदा असं होतं की सगळं हातात असतं पण ती वेळ साधली नाही तर हातात काही उरत नाही. त्या वेळेला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तर अर्थ आहे.”

“जसं या गोष्टीतल्या पिल्लाने केलं.”

“हेच लांडग्याने केलं असतं तर त्याचं पारडं भारी झालं असतं.”

“लांडगा missed it. पिल्लू hits it.”

“हे कमाल आहे.”

“लांडग्याने संधीची माती केली. हेच बकऱ्याच्या पिल्लाने मात्र संधीचं सोनं केलं.”

 

-वरुण भागवत  

Comments

  1. खरं आहे, आलेल्या संधीच जो सोनं करू शकतो तोच पुढे जातो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...