Skip to main content

तुझ्या कर्माने मर...

A Click by: Varun Bhagwat


राजाचे दोन सेवक सोमू आणि चंदू राजाच्या अन्यायाला वैतागले होते. सोमू म्हणाला, “काही माणसांनी कितीही भ्रष्टाचार केला, कसेही वागले, कोणाचं काही वाईट केलं, तरी त्यांचं काही वाईट होतंच नाही.”

“तू कशाला त्यांच्या वाईटावर आहेस पण?”

“नसावं का?”

“असावं का?”

“वाईट माणसांचं चांगलं व्हावं वगैरे असा विचार मी करू शकत नाही.” सोमू जवळजवळ चिडतच म्हणाला.

“मी कुठे म्हणतोय असा विचार कर.” चंदू शांत होता.

“तू स्पष्ट बोल.”

“मी म्हणतोय की त्यांचं चांगलं व्हावं हा विचार नको करूस पण वाईट व्हावं असा सुद्धा विचार करू नकोस.”

“कालपर्यंत राजाचं वाईट चिंतणारा तू आज एकदम असं बोलतोस तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं.” सोमू बोलून गेला.

“किस्साच तसा घडलाय म्हणून मी हे बोलतोय.” चंदू सांगत होता.

“नेमकं काय घडलंय?” सोमूने विचारलं.

चंदू सांगू लागला, “अरे काल राजा नेहमीप्रमाणे शिकारीला गेला. पण जंगलाकडे जाताना वाटेवर भलतंच घडलं. आपल्या राजाला कारण नसताना दुसऱ्याला त्रास देणं फार आवडतं. सोबत असणाऱ्या सेवकाची तो क्रूर थट्टा करत होता आणि मजा घेत होता. थोडं पुढे गेल्यावर त्याने एक झाड शोधलं आणि झाडावर जाऊन शिकारीची वाट पाहत बसला. राजाने खाली पाहिलं तर एक कुत्रा कारण नसताना एका सश्याला छळत होता. बिचारा ससा घाबरून बिळाकडे परतू लागला. मात्र कुत्रा पाठ सोडेना. सश्याची थट्टा करता करता कुत्र्याने एक फटका त्याला मारला. ससा बिळात शिरला पण त्या फटक्यामुळे त्याच्या कानाला इजा झाली. तेवढ्यात एक माणूस तिथून जात होता. माणसाच्या रस्त्यात हा कुत्रा येत होता. म्हणून माणसाने एक दगड उचलला आणि कुत्र्याला मारला. कुत्रा केकाटत तिथून निघून गेला. राजासोबत आलेल्या सेवाकांपैकी एकाचा घोडा मनमानी करू लागला आणि सुसाट सुटला. त्याच्या वाटेत तो कुत्र्याला दगड मारणारा माणूस आला आणि घोडा त्या माणसाला जोरात धडक मारून गेला. माणसाच्या कंबरेत त्या घोड्याची लाथ बसली नि माणूस जागेवर गप्प बसला. तो घोडा बेभान होता. त्याचा स्वत:वर ताबा राहिला नव्हता. तो थेट समोरच्या एका झाडाला जाऊन धडकला. त्याला चांगलीच दुखापत झाली. राजा हे सारं पाहत होता. अचानक आकाशवाणी झाल्यासारखा आवाज त्याच्या कानावर आला, “राजा, तू तुझ्या कर्मानेच मरणार.” राजाचा विचार अचानक बदलला. तो क्षणार्धात झाडावरून खाली उतरला. उतरता क्षणी मोठा आवाज झाला. राजाने पाहिलं तर तो झाडावर ज्या जागी बसला होता तिथे वरतून एक मोठ्ठा दगड येऊन पडला होता. राजा थोडक्यात बचावला होता.” चंदू बोलता बोलता थांबला.

“अरे बाप रे, खरंय. प्रत्येक जण आपल्या कर्माने मरतो. म्हणून राजाने आज सर्वांशी संवाद साधायचा असल्याची घोषणा केलीये तर. काय बोलायचं असेल राजाला? ” सोमू विचारपूर्वक म्हणाला.

“आजपर्यंत केलेल्या अन्यायाची माफी मागायची असेल.” चंदू उत्तरला.

“तुला कसं माहित पण हे सगळं?” सोमूने विचारलं.

“मी उल्लेख केल्याप्रमाणे शिकारीला जाताना राजा ज्या सेवकाची थट्टा करत होता तो सेवक मी होतो. “तू तुझ्याच कर्माने मर!” ही राजाला जी आकाशवाणी वाटली ती आकाशवाणी नसून राजा ज्या झाडावर बसला होता त्या झाडापेक्षा अजून एका उंच झाडावर चढून मी बसलो होतो, राजाला मारायच्या हेतूनेच. पण जे राजाने पाहिलं तेच मी पण पाहिलं... जो तो आपापल्या कर्माने मरत होता.” चंदूने खुलासा केला.

 सोमू चंदूला म्हणाला. “खरं आहे. पण एक प्रश्न राहतोच. चंदू, तू मारलेल्या दगडाचा नेम चुकून चुकला की मुद्दाम चुकवलास?”

-       वरुण भागवत   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...