Skip to main content

बाप लेकाचं नातं


वेद आणि सिद या २ मित्रांचा संवाद चालू होता.

“आज father’s day आहे म्हणे.”

“हां... ते days चे प्रकार वर्षभर चालूच असतात.”

“ते खरंय.”

“कशाला लागतात रे हे days?”

“कदाचित व्यक्त व्हायला.”

“बाकी जाऊ दे, पण तू वडिलांवर कितीही व्यक्त हो, त्यांना त्यांच्या लेकापेक्षा लेकीच प्रिय.”

“हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू नाहीये.”

“अरे, पण जास्त करून असंच असतं की नाही?

“हो, पण त्यात बापाची चूक नाही. तो मुलीबाबत जास्त हळवा असतो इतकंच.”

“इतका हळवा की मला अगदी हिडीस-फिडीस करावं का?”

“सिद, chill. काय भांडला आहेस का वडिलांसोबत?”

“तसं नाही यार वेद, मुलाचं वडिलांसोबत नातं सोपं नसतं नाही?”

“नाही. नसतं. हे मला मान्य आहे.

“मी तर म्हणेन ते थोडं अर्धवट असतं.”

“अर्धवट?”

“हां... बाकी काही असो... पण त्या निमित्ताने म्हण किंवा काय, मी वडिलांवर थोडसं लिहिलंय वेद..”

“तू लिहिलंयस?”

“हो.”

“मगाशी तर म्हणत होतास मला days चं काही कौतुक नाही आणि तू तर लिहिलंयस...”

“आता बोलू की नको?”

“आता काय बोलतोस?”

“अरे म्हणजे ऐकवू की नको?”

“काय ऐकवतोस?”

“माझी थट्टा करणार असशील तर नंतर बोलू.”

“तसं नाही रे... तू आणि लिहिलं आहेस हे ऐकूनच जरा हसू येतंय.”

“एखाद्याला कौतुक वाटलं असतं, तुला हसू येतंय.”

“गप रे... college सुटल्यानंतर पेन सुद्धा हातात नाही घेतलंस आणि आज काहीतरी लिहिलंयस??”

सिद काहीच बोलला नाही. आता मात्र वेद थोडा serious होत म्हणाला की ऐकव.

 

सिद थोडी background देऊ लागला, “कदाचित अनेकांच्या मनातलं असेल हे.”

वेद म्हणाला, “ते आम्ही ठरवू. मुद्द्यावर या.”

सिद बोलू लागला, “कवितेचं नाव आहे- बाप लेकाचं नातं!

त्यांना वाटावं मी काही बोलावं,

मला वाटावं त्यांनी काही बोलावं,

बाप-लेकाच्या नात्याचं गणित हे असं का असावं?

आमच्या या अबोल असण्याने दोघांना अधुरं अधुरं का सोडावं?

 

काही बोलायचं म्हणजे भय वाटावं!

न बोलणंच जास्त सोयीचं होऊन जावं!!

अंतराने संवादाला का मारावं?

आमचं नातं अधुरं का राहावं?

 

दुराव्याला घाबरावं,

जवळ येण्यालाही भ्यावं,

असलं कसलं नातं असावं?

बाप लेकांना ज्याने अधुरं ठेवावं!

 

बापाचं मग वय व्हावं,

त्याने अलगद ‘बाळा’ म्हणावं!

मलाही नकळत भरून यावं,

पण ते दाखवण्याचं धैर्य तेव्हाही नसावं!

बाप लेकाच्या नात्याला नेमकं काय म्हणावं?

 

आमच्या संवादाने कायम अबोल व्हावं!

घट्ट मिठीने संवादाला नवं स्वरूप द्यावं!

मी त्यांना बिलगावं,

त्यांना न दाखवता मी, नि मला न दाखवता त्यांनी, अश्रूंच्या धारेला मोकळं होऊ द्यावं!

 

मी मोकळं व्हावं,

त्यांनी मोकळं व्हावं,

अधुऱ्या नात्याला अश्रूंनी धूसर करावं,

नि त्या अधुरं असण्याला आता कदाचित पूर्णत्त्व मिळावं!!”

 

वेद काहीच बोलत नव्हता. त्याने अलगद कवितेचा कागद घेतला. त्यावर खाली सिद ने आपलं नाव लिहिलं होतं आणि तारीख होती. तारीख १ वर्षापूर्वीची होती.

वेद पटकन म्हणून गेला, “बाप-लेकाच्या नात्याचं गणित हे असं का असावं?

वर्षापूर्वी लिहिलेलं तू त्यांना आत्ता का द्यावंस?”

सिद म्हणाला, “कदाचित आमचं हे नातं असं अव्यक्तच असावं!!!”

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...