| A click by: Varun Bhagwat |
उन्हाळ्याचे दिवस होते. तापमान भयंकर वाढलं
होतं. पाणवठे कोरडे पडत चालले होते. २ बेडूक जिथे राहत होते तिथला पाणवठा पण पूर्ण
कोरडा झाला होता. त्यांना तिथून हालणं भाग होतं. बदलाचा स्वीकार गरजेचा होता. नाईलाज
होता. ते पाण्याच्या शोधात निघाले. खूप
कष्टाने एक विहीर त्यांना सापडली, ज्यात थोडं पाणी शिल्लक होतं. एका बेडकाने तिथेच
ठाण मांडलं आणि म्हणाला, “आपण इथेच राहतोय.” दुसऱ्याने विहीर पाहिली आणि खूप खोल
असलेलं पाणी पाहून म्हणाला, “ऐक माझं, नको.”
पहिला वैतागून म्हणाला “तुला कळतंय का आपण
किती कष्ट केलेत?”
“हो कळतंय.” दुसरा उत्तरला.
“मला नाही वाटत तुला कळतंय..”
“असं का?”
“जर तुला हे जाणवत असतं तर आज आपण इथेच या
विहिरीचा आसरा घेण्याचा निर्णय पक्का केला असता.”
“पण मी नाही थांबायचं असं म्हणतोय..”
“तेच... असं का? असशील माझा senior... पण
म्हणून ही मनमानी बरी नव्हे.”
“ही मनमानी नाही तर याला holistic thinking
असं म्हणतात.”
“काय म्हणतात?”
“Holistic thinking अर्थात समग्र विचार!”
“आपण इतक्या दुरून आलोय. कष्ट पडलेत. इथे
पाण्याचा साठा आहे. काय हरकत आहे हा उन्हाळा इथे काढायला?”
“जवळच्या फायद्यासाठी दूरचं नुकसान सोसायचं
हे मला पटत नाही.”
“Oh... philosophy नकोय.”
“Fact आहे.”
“ऐक माझं... इथून चल. नंतर explain करेन.”
“Fine.”
ते तिथून पुढे निघाले. खूप चालले. प्रचंड
कष्टानंतर त्यांना एक मोठं तळं सापडलं ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी होतं.
उन्हाळ्याची चिंता खरी खरी मिटत होती. दोघेही ते बघून खुश झाले. कष्टाचं चीज झालं
होतं.
पहिला बेडूक काहीतरी आठवून म्हणाला, “By the
way, हे holistic thinking काय असतं?”
दुसरा म्हणाला, “आत्ता तू पाण्याचा आनंद घे.
आत्ता नको माझी philosophy.”
पहिला बेडूक हसला आणि पाण्यामध्ये मनसोक्त
डुंबू लागला. मध्ये काही दिवस गेले. ते जी विहीर सोडून पुढे आले होते, त्याच गावात
राहणारी एक बाई त्या तळ्याकाठी आली. ती तळ्यातून पाणी भरू लागली आणि स्वत:ला
म्हणाली, “नशीब ह्या तळ्यामुळे पाणी तरी मिळतंय. गावातली विहीर कोरडीठक्क आहे.”
तिने पाणी भरलं आणि जाऊ लागली.
दोन्ही बेडकांनी हे बोलणं ऐकलं.
पहिला आनंदून गेला नि त्याचबरोबर शरमूनही
गेला आणि दुसऱ्याला म्हणाला, “माझं चुकलं साहेब. You were right.”
दुसरा पहिल्याला म्हणाला, “Now, let me
explain. आपण जर त्या विहिरीचा आसरा घेतला असता तर थोडे दिवस नक्की मजेत गेले असते
पण नंतर विहीर कोरडी पडली असती. इतक्या खोल विहिरीतून आपल्याला बाहेर येणंसुद्धा
मुश्कील झालं असतं. मग मरायचं आहे तर इथे कशाला? अजून थोडं शोधलं तर हवं आहे ते
मिळेल ना... हा सगळा विचार मी तिथे केला. म्हणून तुला म्हणालो की जवळचा फायदा
दूरचं नुकसान तर करत नाहीये ना? हा झाला समग्र विचार. पटकन घाईत केलेली कृती
आपल्याच अंगलट आली असती. म्हणून हा निर्णय घेतला. थोडं जास्त exert करावं लागलं. I agree. पण फळ छान मिळालं
ना...”
“Yes sir.. चला...”
“कुठे?”
“डुंबायला... Let’s celebrate.”
- वरुण भागवत
Nice
ReplyDeleteWaa! Chan... 👌👌👌👌
ReplyDeleteबरोबर
ReplyDeleteWaa! Holistic thinking!
ReplyDelete🙋👌👍