Skip to main content

दृष्टीकोन

A click by: Varun Bhagwat 


प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार वेगळा असतो. जो तो आपापल्या नजरेने, आपापल्या तऱ्हेने आयुष्याकडे कसं बघायचं हे ठरवत असतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की समोरच्याची अशी mentality कशी असू शकते आणि समोरच्याला प्रश्न पडतो की आपली mentality तशी असूच कशी शकते? उत्तर मिळत नाही. आपण अस्वस्थ होतो. पण पुन्हा प्रत्येक जण वेगळा आहे.  मूळ स्वभाव बदलत पण नाही. या सगळ्या विचारांनी आणि प्रश्नांनी अक्षयला अक्षरश: दिवसभर घेरलं होतं.

त्याला वाटायचं की सगळी माणसं त्याच्यासारखी सरळ जगतात. पण हळूहळू दुनियादारी कळत होती. निरनिराळी माणसं त्याला भेटत होती. योगायोगानेच या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वत:लाच त्याच रात्री वाचलेल्या गोष्टीतून मिळाली.

एक होता बैल. तो खूप राबायचा, कष्ट करणं त्याला ठाऊक होतं. एक होती पिसू. हिला काम हा शब्दच माहित नाही. कोणीतरी काम करतंय हे पाहून तिला विशेष आश्चर्य वाटायचं. जसं या बैलाला ही पिसू काहीच काम करत नाही यावरून आश्चर्य वाटायचं. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा होता. पिसू चा वेळ जात नसे. बैलाला मोकळा वेळ मिळत नसे. अशाच रिकामटेकड्या वेळात पिसूने बैलाला विचारलं, “काय भाऊ, किती काम करता... राब राब राबता... लोकांची ओझी उचलता... मी बघ. लोकांचं रक्त पिते बस्स!”

बैल म्हणाला, “खरंय. तू फक्त तेच करू शकतेस. मी कष्ट करतो. पण मग माणसं माझ्याशी प्रेमाने वागतात. चांगलं खायला देतात. मला आसरा मिळतो.  दमलो की मला छान थोपटतात आणि माझ्यावर प्रेम करतात. मला कौतुकाची थाप देतात.”

पिसू तिच्याच तोऱ्यात म्हणाली, “मला पण थाप देतात. पण मी ती घेत नाही. मी ती चुकवते. ती थाप जर मला बसली, तर तो माझा शेवट असेल..”

गोष्ट वाचून संपली.  अक्षयला वाटत होतं की आपण इतके कष्ट करतो एक कौतुकाची थाप मिळविण्यासाठी. मात्र कितीतरी जण असे असतात ज्यांना ही थाप किंवा माणूस जपणं वगैरे दुरापास्त असतं आणि त्यांना फरक पण पडत नाही. ही माणसं फक्त फायदा बघतात. पण पुन्हा त्याला जाणवलं की माणसं विविध प्रकारची आहेत. कोणी थाप मिळवण्यासाठी जगतं तर कोणी थाप चुकवण्यासाठी!  


प्रत्येक जण आपण बदलू शकत नाही. प्रत्येकाला बदलायला सुद्धा जाऊ नये. प्रत्येकाचा दृष्टीकोन ठरलेला असतो. तो आपण फार बदलू शकत नाही. आपण आपल्याला योग्य वाटतं ते मात्र नक्की करू शकतो. आपण बैल आणि पिसू याच्या मधलं काहीतरी होऊ शकतो. फक्त कौतुकाची थाप घेणारे नाही तर देणारे पण बनू शकतो. आपण बघू तसं जग आहे. आपला दृष्टीकोन आपलाच आहे.


-       वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...