Skip to main content

यशाचं शिखर

A click by: Varun Bhagwat

खूप मोठे आणि यशस्वी उद्योगपती सुरंजन यांना नुकतच एक award मिळालं होतं.  त्याप्रित्यर्थ त्यांचा interview चालू होता. interviewer अजित चे प्रश्नांवर प्रश्न चालू होते. त्याला सुरंजन फार सुरेख उत्तरं देत होते.

“सर्वांनीच बोध घ्यावा असे तुमचे विचार आहेत sir.” अजित म्हणाला.

सुरंजन फक्त हसले.

“सर, तुम्ही यशाच्या ज्या शिखरावर सध्या आहात तिथून सगळीकडे बघताना कसं वाटतंय? सगळं आता फार सोपं वाटत असेल नाही?”

“बिलकुल नाही.”

अजितला उत्तर अनपेक्षित होतं. तो म्हणाला, “तुम्हाला रोखणारा कोण आहे? तुम्ही top वर आहात असं म्हणायला हरकत नाहीये.”

“Top वगैरे फार तात्पुरतं असतं.”

“As in?”

“आपण कोणत्याही शिखरावर पोहोचलो तरी कोणतीच गोष्ट casually घेऊन चालत नाही. तू म्हणतोस तसं so called यशाच्या शिखरावर असताना तर मुळीच नाही. You need to be alert all the time. कोणालाच कमी लेखायचं नाही.”

“ते तर खरंय सर.”

“खूप खरंय. माझ्या उद्योगाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मी हा धडा शिकलो की Never take anyone and anything for granted. हे ही शिकलो की दुसऱ्याच्या अनुभवावरूनही आपण शिकूच शकतो.”

“असं नेमकं काय घडलं?”

“आज तारीख काय आहे?”

“२५ जून.”

“हीच तारीख आणि काही वर्षं मागे जाऊया.”

“मला कळलं नाही.”

“India ने आपला पहिला- वहिला cricket world cup केव्हा जिंकला?”

“१९८३.”

“हो. २५ जून १९८३.”

“पण त्याचा not taking anything for granted शी काय संबंध?”

“ऐक तर खरं. त्या काळी West-Indies ही अभेद्य team होती. त्यांनी already २ world-cups खिशात टाकले होते. १९८३ ला अर्थात तिसऱ्या world cup ला final match ला सुद्धा ते पोचले आणि तिसरा world  cup खिशात घालायची तयारी करत होते. भारत विरुध्द वेस्टइंडीज असा सामना रंगणार होता. तुमच्या सारख्या अनेक news वाल्यांनी तर जवळपास declare केलं की वेस्टइंडीज तिसरा world cup जिंकायच्या तयारीत!”

“पण जिंकलो आपण. India...”

“Right.”

“असं का झालं असेल?”

“कारण वेस्टइंडीज ने India ला फार casually घेतलं.”

“Yes. अवघा १८३ score भारत करू शकला होता. ते target विंडीजला ६० overs मध्ये गाठायचं होतं. Match हातातली होती. पण ह्यात काय विशेष आहे असा काहीसा त्यांचा विचार झाला असावा आणि यशाच्या उच्च शिखरावर असताना दाणकन खाली आपटायची वेळ त्यांचावर आली.”

“True.”

“हे झालं तू मगाशी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. आपण कुठेही पोहोचलो तरी झाकीत जायचं नाही. काम पूर्ण होईतो celebrate करायची गडबड करायची नाही. कारण जोपर्यंत result लागत नाही तोपर्यंत कोणतीच team जिंकलेली नसते.”

 

-       वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...