Skip to main content

मित्राने थोबाडीत मारली आणि...


A Click by: Sushil Ladkat


“दादा, please यार, महेश माझ्याशी अशा पद्धतीने वागणार असेल ना तर खरंच त्याचा आणि माझा संबंध संपला. दोस्ती गेली तेल लावत.”

“Don’t overreact प्रशांत.”

“मी overreact करतोय?”

“तो चुकून तुझ्या अंगावर ओरडला असणारे.”

“चुकून?”

“हां... म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं tension असेल आणि तू wrong timing ला काहीतरी बोलला असशील. म्हणून म्हणलं चुकून ओरडला असेल.”

“असं कोणी चुकून ओरडतं का?”

“नुसतं ओरडत नाही... मारतं पण..”

“काय?”

“अरे त्या २ मित्रांच्या गोष्टीमध्ये नाही का अक्षय तुषारच्या कानाखाली मारतो.”

“असं अर्धवट सांगू नको.”

“२ मित्र म्हणजेच अक्षय आणि तुषार beach वर निवांत बसले होते. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि अक्षयने तुषारच्या कानाखाली वाजवली.”

“आणि मग?”

“मग काय... तुषार ने समुद्रकिनाऱ्यावरच्या रेतीत लिहिलं- आज माझ्या मित्राने मला थोबाडीत मारली.”

“इतकंच?”

“हं... थोडा वेळ शांततेत गेला. हे होऊन सुद्धा त्यांचा समुद्रात मस्त डुबकी मारायचा plan काही बदलला नाही.”

“आश्चर्य आहे.”

“कदाचित मिटवलं असेल त्यांनी. may be अक्षय sorry म्हणाला असेल.”

“तुषार ने उलटा हात नाही उचलला?”

“मैत्रीत असं नसतं प्रशांत. त्यांच्या मैत्रीत तरी नव्हतं. So, मग ते दोघेही समुद्रात थोडे आत गेले. नेमकी एक मोठी लाट आली आणि अक्षयच्या लक्षात आलं की तुषार पाण्यामध्ये गटांगळ्या खातो आहे. अक्षय पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने पटकन तुषारला वाचवलं. सुरक्षितपणे पाण्याबाहेर आणलं. तुषार किनाऱ्यावर शांत बसला होता. मध्ये थोडा वेळ गेला. तुषार तिथून उठला. तुषारने जवळ असणारी एक टोकदार वस्तू उचलली. तिथून थोड्या अंतरावर एक दगड होता. तुषार दगडाजवळ गेला. त्याने दगडावर कोरलं- आज माझ्या मित्राने मला मरणाच्या दारातून वाचवलं.”

 

प्रशांतला त्या क्षणी तो प्रसंग आठवला जेव्हा त्याचा accident झाला होता आणि त्याला पहिलं हॉस्पिटल मध्ये नेऊन प्रसंगाचं भान जपणारा महेश आठवला. प्रशांत एकदम शांत झाला.

त्याने दादाला विचारलं, “दादा, पण या गोष्टीत तुषारने त्याच्या बाबतीत घडलेले चांगले-वाईट दोन्ही प्रसंग लिहिलेच की. मग यात...”

प्रशांत ला तोडत दादा म्हणाला, “खरंय. पण त्याला थोबाडीत बसली होती ते वाक्य त्याने रेतीत लिहिलं, जे येणाऱ्या लाटांसोबत पुसलं गेलं. मात्र अक्षयने त्याचा जीव वाचवला ते वाक्य त्याने दगडात कोरलं. मतितार्थ लक्षात घे. वाईट गोष्टी पटकन let go करता आल्या पाहिजेत. Memory चांगल्या गोष्टींची जमवायची. महेश च्या मनात काही नसतं हे तुलाही माहितीये. माफ करता आलं पाहिजे. माफी सोड, वाईट तेवढं सोडून देता आलं पाहिजे. असं ego वर घेतलंस तर ‘मैत्री’ या शब्दाला किंमत राहणार नाही. तू त्याच्याशी संबंध संपवून जिंकशील सुद्धा पण त्या जिंकण्याला काय अर्थ आहे ज्याचा आनंद घेता येऊ शकत नाही? त्याच्याशी न बोलून तू खुश राहशील का? मनाच्या कागदावर चांगल्या गोष्टींची आठवण कोरावी. बाकी कागद कोराच ठेवावा. नव्या आठवणी कोरण्यासाठी.”    

तेवढ्यात प्रशांत ची message tone वाजली. महेश चा message होता. “sorry यार आज जे झालं त्याबद्दल... तुला भेटावं वाटतंय. वेळ आहे?”

प्रशांतचा आपसूक reply गेला, “भरपूर!”

 

-वरुण भागवत

Comments

  1. व्वा व्वा अप्रतिम.. छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठी छान शिकवण मिळत आहे

    ReplyDelete
  2. Friendship is forever beloved of love... 🙋😍👌👍
    Khup Chan ☺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...