Skip to main content

Position चं महत्त्व!

A Click by: Varun Bhagwat


“ताई कोण लागून गेली आहे ही?”

“अगं प्रिया काय झालं?”

“ताई कशी बोलली ती मला!!!”

“कोण?”

“अगं ती मीना जिला मी report करते ती.”

“प्रिया, तुझा job नवीन आहे, तू तर नाही ना काही घोळ घातलायस?”

“नाही गं ताई. उलट माझा job नवीन आहे म्हणूनच ती असं वागतीये.”

“म्हणजे? मला नीट सांग.”

“ताई अगं तुला मीना आठवते का जी माझ्याच batch ला होती.  Just because माझ्या आजारपणामुळे माझं १ वर्षं वाया गेलं आणि ती माझ्या पुढे गेली. त्यात आता योगायोग असा की आम्ही एकाच कंपनीत एक वर्षाच्या फरकाने लागलो. तो एक वर्षाचा फरक महागात जातोय.”

“प्रिया आज काय नेमकं घडलं ते सांग.”

“मीना... sorry sorry... मीना madam आमची morning meeting घेत होत्या. एक point मी मांडत होते तेव्हा मी तिला first name ने mention केलं. I mean ‘मीना’ असं म्हणाले. तर माझा point राहिला बाजूला, ती मला सगळ्यांसमोर म्हणाली की मला madam म्हणायचं बरं का! Senior आहे मी तुझी.”

“मग बरोबर आहे ना..”

“काय बरोबर आहे? ताई तुलाही माहितीये एका semester मध्ये तर ही फक्त माझ्या notes वर अभ्यास करून pass झालीये. आम्ही बरे वागायचो एकमेकांशी college मध्ये. आता हा कसला माज आहे हिला?”

 

ताई फक्त हसली.

 

“ताई तुला हसायला येतंय? हे बघ तिला madam म्हणणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. पण मला तिची पद्धत नाही पटली. मला आश्चर्य वाटतं की अशी कशी माणसं बदलतात?”

“Position बेटा... थोडी वरची position मिळाली की काही माणसांना वाटतं आपणच सर्वश्रेष्ठ. तुला माहितीये का एका छोट्या सशाला गावाबाहेर आणि जंगलाजवळ असणाऱ्या पडक्या घराच्या छतावर जाण्याचा मार्ग सापडला होता. तो त्या ‘Position’ वर असल्याने खालून जाणाऱ्यांना फार कमी लेखत असे. एकदा एक वाघ खालून जात होता. वाघाचा आज चांगला mood होता.  तो सशाला म्हणाला “काय रे ससुल्या, बरं चाललंय ना?” त्यावर ससा चिडून म्हणाला, “ए वाघ्या, ससे भाऊ म्हणायचं आपल्याला.”

“तो त्याला वाघ्या म्हणाला?? मग वाघाने काय केलं?”

“वाघ फक्त हसून निघून गेला.”

“आईशप्पथ!! असं कसं? तो काही बोलला नाही.”

“मोठी माणसं बोलत नाहीत. करून दाखवतात. तू ही त्या ससुलीला काही बोलू नकोस.”

“ससुली?”

“अगं म्हणजे तुझी मीना madam. तिला काही बोलू नकोस.”

“ह्याला काय अर्थ आहे? त्या वाघाने तरी असं का सोडून द्यावं?”

“वेळ प्रत्येकाची येते. वाघाची पण वेळ आली. त्या छतावर किती दिवस बसेल ससा? खाली यावंच लागलं. एक दिवस सापडला वाघाच्या हाती.”

“मग वाघाने केली का शिकार? घेतला का बदला? चांगली संधी मिळाली होती.”

“नाही बाळा. वाघाने बदल्याच्या पुढची step घेतली.”

“म्हणजे?”

“वाघाने सश्याला पकडलं. ससा घाबरून म्हणाला वाघ साहेब मला please सोडून द्या. वाघ म्हणाला की माझी ध्येय मोठी आहेत. तुझ्यासारख्यांच्या नादी लागून मला माझी energy घालवायची इच्छा नाही.”

“असं म्हणाला तो?”

“हं... एक दिवस येईल. तू मीनाच्या पुढे जाशील. तू किती sharp आहेस मला माहितीये.”

“मग पुढे गेल्यावर त्या वाघासारखं तिला बोलू?”

“बोलायची गरज पडणार नाही.”

“काहीतरी बोलू दे की.”

“गरज नाही. तुझी position तिला जागेवर आणेल.”

“हे solid आहे.”

“पण म्हणून तू तिच्याशी वाईट वागायचं नाही. नाहीतर तुझ्यात आणि तिच्यात फरक काय? आता ती मीना सगळ्यांसमोर तुला बोलली यामुळे तीच बाकीच्यांच्या पण नजरेतून उतरली की नाही? Position मिळाली तरी वापरता आली पाहिजे. तर तिचं महत्त्व टिकतं.”

 

-वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...