Skip to main content

खेकडा आणि scope

A click by: Varun Bhagwat

खेकडा हा जास्तीत जास्त समुद्रकिनारी आढळणारा प्राणी. ३ खेकडे मित्र जमले. यातल्या दोघांना एकदा लहर आली दुसरीकडे जाण्याची. त्यांचा जंगलाकडे जाण्याचा विचार झाला. तिकडे त्यांना भक्ष्य मिळवण्याच्या दृष्टीने बरंच ‘कुरण’ मिळेल असं जाणवलं. म्हणजेच तिकडे जास्त scope जास्त आहे अशी त्यांची धारणा झाली.

एक मात्र त्यांच्याशी सहमत नव्हता. एवढा फायदा होऊ शकतो असं त्यांच्या बोलण्यातून वाटत असून सुद्धा त्याला काय वाटलं कोणास ठाऊक आणि तो म्हणाला, “तिकडे जाण्याच्या दृष्टीने त्या प्रभागाची संपूर्ण माहिती, ज्ञान, आपली तिथे टिकण्याची क्षमता आपण विचारात घेतली पाहिजे .आपण तिकडे टिकणार नाही. हे आपलं क्षेत्र आहे. आपण इथे जास्त प्रगती करू शकतो.”


दुसरा म्हणाला, “काय negative विचार आहेत याचे.”

तिसरा म्हणाला, “नाहीतर काय, ह्याला नवीन काही नकोच आहे.”

पहिला म्हणाला, “मला नवीन नकोय असं नाहीये. पण ज्या क्षेत्रात मी बरं काम करतोय, अर्थात या समुद्रात, तिथे मी mastery मिळवेन ना.  माझ्या मते ही अविचारी रिस्क आहे.”

“ह्याला सोड. ह्याला तिथलं कुरण दिसत नाहीये. तू मर इथेच.” असं म्हणून त्याला सोडून बाकी दोघांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळवला सुद्धा. प्रवास अवघड होता. पण फायदा पाहून ते जात राहिले. काही काळाच्या प्रवासाने ते तिकडे पोचले. 

A click by: Varun Bhagwat

नवीन प्रदेशाचं नाविन्य होतंच. त्यामुळे सुरुवातीला मजा येत होती. मात्र त्यांनी इथले धोके समजूनच घेतले नव्हते. निर्णयाचा सारासार विचार झाला नव्हता. तिथे पोचताच काही कालावधी मजेत गेला मात्र नंतर एका कोल्ह्याला यातल्या एका खेकड्याची विशेष मेजवानी प्राप्त झाली.

दुसरा खेकडा प्रचंड घाबरला. समुद्रकिनारी खेकड्याला अनेक भक्ष्य मिळायची. त्याने हा विचार कधीच केला नव्हता की इकडे आपण पण इतर कोणाचं भक्ष्य बनू शकतो.

माणसांना जसा एखाद्या क्षेत्रात जास्त scope दिसतो, पैसा दिसतो आणि मग त्या दृष्टीने कल तिकडे वळतो आणि मग एकाच्या नादाने बाकीचे जण तिकडे वळतात... बाकी विचार होत नाही. क्षेत्र निवडताना फक्त तिथला फायदा बघून उपयोग नसतो. त्या जोडीने आपली तिथे टिकण्याची क्षमता, आपला आवाका, आपलं skill, ज्ञान, आवड, तिथले धोके हे लक्षात घेणं गरजेचं असतं. तर आपण तिथे टिकतो.

हा घाबरलेला खेकडा परत त्याच्या जुन्या जागी परतला. त्याच्या मित्राला भेटला. त्याला पूर्ण हकीकत सांगितली.

इथे असणारा खेकडा म्हणाला, “अरे पण तिकडे बराच scope आहे ना?”

“प्रश्न scope चा नाही. पण तुझं म्हणणं योग्य आहे. स्वतःचे skills समजून न घेता घेतलेला अविचारी निर्णय ‘अर्थ’पूर्ण असेलच असं नाही. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि क्षेत्र निवडलं पाहिजे.” आणि म्हणाला,

“Sorry. Can I join you?”

“विचारायचं काय त्यात? समुद्र आपलाच आहे. welcome back.”

A Click by: Varun Bhagwat

-       वरुण भागवत

-  

Comments

  1. Aajachya images ne tar ajunach maja aanali

    ReplyDelete
  2. अर्थावरील खरच अर्थपूर्ण लेखन

    ReplyDelete
  3. Good thinking and attitude also

    ReplyDelete
  4. 'अर्थ'पूर्ण लेखन..

    ReplyDelete
  5. लीला राजगेJune 9, 2020 at 2:23 PM

    सुंदर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...