| A Click by: Varun Bhagwat |
रमा आणि शोभा, Psychology शिकणाऱ्या २ मैत्रिणी lecture नंतर जवळच्या
restaurant मध्ये गेल्या. थोडंसं पोटात पडल्यावर आज जे lecture झालं त्यासंबंधी
दोघींची चर्चा चालू होती.
रमा थोडा विचार करत म्हणाली, “Stress ही एक अशी गोष्ट आहे जी दिसत
नाही.”
शोभा त्यावर बोलली, “खरंय. पण दिसत नसली तरी direct affect करते. पण
ना कधीकधी अगदी छोटी गोष्ट असते, पण ती सुद्धा कसा stress create करते हे मात्र
मला झेपत नाही.”
“छोटी गोष्ट as in?”
“अगं रमा, अनेकदा कारण किती फालतू आहे असं दिसतं पण तेवढ्यावरून
एखाद्या माणसाचा ताबा सुटतो किंवा he/ she breaks down.”
“हं...”
“हं काय अगं? थोडासा stress पण bear करता येत नाही का?”
“तसं नाहीये ते शोभा.”
“मग कसं आहे?”
“दिसताना एखादी गोष्ट छोटी दिसते. पण ती अनेकदा निमित्तमात्र असते. नुसती
निमित्तमात्र असते म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतं की प्रत्येकाचं एक सहन
करण्याचं limit असतं, the moment you cross that limit, तो माणूस पूर्ण खचतो
शोभा.”
“तुला नक्की काय म्हणायचंय?”
“हे बघ ते limit ओळखता आलं पाहिजे. एखादा काम करतोय म्हणून त्याला
कामं देतंच राहणं आणि त्यानेसुद्धा ते स्वीकारत राहणं (कदाचित नाईलाजाने) हे काम
देणाऱ्यासाठी आणि काम घेणाऱ्यासाठी खूप महागात पडू शकतं.”
“मला संदर्भ नाही लागत आहे.”
काहीतरी आठवल्यासारखं करत रमा म्हणाली, “Oh... right. तू आज थोडी
late आलीस ना lecture ला. तू सुरुवातीची सरांनी सांगितलेली एक गोष्ट miss केलीस.”
“कोणती?”
“गोष्ट फार simple आहे but if you can relate to what we are talking
right now, मग जास्त नीट झेपेल.”
“सांग ना.”
“गोष्ट पूर्वीची, जेव्हा उंटाच्या पाठीवर सामान लादून नेलं जात असे.
एका व्यापाऱ्याने असंच त्याच्या उंटाच्या पाठीवर सामान लादलं. त्याला आपल्या उंटाची
capacity खरंतर माहित होती. ती check करण्यासाठी त्याच्याकडे भारी उपाय होता. तो
उंटाला खाली बसवत असे, त्याच्या पोटाखाली वीट ठेवत असे आणि पाठीवर सामान लादत असे.
वीट ज्या क्षणी फुटायची त्या क्षणी व्यापाऱ्याला समजायचं हे उंटाचं tolerance
limit. मग तो अजून सामान न लादता त्याला पुढे नेत असे.”
“Measurement of stress...”
“हो पण त्यातून व्यापारी शिकायचं ते शिकला नाही.”
“म्हणजे?”
“एकदा असंच सामान लादून उंटाला घेऊन चालला असताना त्यांना रस्त्यात
एक काडी घेऊन जाणारी मुंगी भेटली. मुंगी म्हणाली, “व्यापारी दादा, मला ही काडी जड
होतेय. तुमचा उंट इतका मोठाय. इतकं सामान घेऊ शकतो. जरा वेळ काडी घेऊ दे ना माझी.”
व्यापाऱ्याने विचार केला एका काडीने काय होणारे असं म्हणत त्याने ती काडी उंटाच्या
पाठीवर लादली. मी मगाशी म्हणाले ना, एखादा काम करतोय करतोय म्हणून त्याला कामं
देतंच राहणं आणि त्यानेसुद्धा ते स्वीकारत राहणं (कदाचित नाईलाजाने) हे काम
देणाऱ्यासाठी आणि काम घेणाऱ्यासाठी खूप महागात पडू शकतं.”
“पण इथे कुठे असं काय घडलं?”
“शोभा, ज्या क्षणी ती काडी व्यापाऱ्याने उंटाच्या पाठीवर लादली त्या
क्षणी उंटाची पाठ मोडली आणि तो खाली बसला.”
“Oh... so ही सहनशक्तीची मर्यादा होती, काडी ही निमित्तमात्र ठरली.
“Yes आणि capacity पेक्षा जास्त झालं की काडी सुद्धा खूप असते. त्या
tolerance limit चं भान ठेवावं. नाहीतर मग माणूस बोलून स्फोट करतो किंवा त्या
ताणाने पूर्ण खच्ची होतो या उंटासारखा."
-वरुण भागवत
Very true...
ReplyDeleteउत्तम दृष्टांत...
ReplyDeleteYes...
ReplyDeletePerfect observation...
Nice writing of skill..
🙋👌👌👌
खरं आहे प्रत्येकाने आपली limit ओळखलीच पाहिजे तसेच दुसऱ्याची limit समजून घेतली पाहिजे म्हणजे दोघांचंही जीवन सुकर होईल, आजकालच्या कॉर्पोरेट युगात हे नीट जपलंच पाहिजे
ReplyDelete