Skip to main content

Coffee च best...

A Click by: Varun Bhagwat

“आजी मी खरंच वैतागले आहे आता.”

“झालं तरी काय?”

“problems, problems आणि फक्त problems...”

“त्यातून काहीतरी पुढे चांगलं होणार असेल.”

“problems ने कोणाचं कधी काही चांगलं होतं का?”

“बरं बाई, नसेल होत. ते सोड. मी सांगितलेल्या गोष्टी आणल्यास का बाजारातून?”

“हो. हे घे. बटाटे, अंडी आणि coffee पावडर.”

 

आजीने शेगडी वरती ३ पातेल्यांमध्ये गरम पाणी उकळत ठेवलं होतं. त्यातील एका पातेल्यात तिने बटाटे घातले. दुसऱ्यात अंडी आणि तिसऱ्या पातेल्यात coffee पावडर घातली. मध्ये थोडा वेळ गेला. नात हॉल मध्ये जाऊन बसली. थोड्या वेळाने आजी बाहेर येऊन पुन्हा नातीशी गप्पा मारू लागली.

 

“हां, कसले problems गं?”

“जसं आहे तसं काही राहू नाही का शकत काही?”

“काय आहे तसं ठेवायचं आहे? पहिले जाऊन ती पातेली उतरव.”

“उतरवली.”

“इकडे आण.”

“आज आपण उकडलेले बटाटे, अंडी आणि coffee असं खाणार आहोत का आजी?”

 

आजी मनापासून हसत म्हणाली, “खूप दिवस झाले तुझं ऐकत होते आज विचार केला की एक प्रयोग करूया.”

“कसला प्रयोग?”

“बटाट्यांना हात लाव बरं.”

“काय?”

“अगं लाव तर... हां, काय जाणवलं?”

“ते गरम आहेत.”

“ते असणारच.. अजून?”

“मऊ झालेत.”

“अरे वा. अंडी बघ.”

“उकडली गेलीयेत.”

“coffee बघ.”

“coffee ला कसा हात लावू? आजी म्हणायचं काय आहे तुला?”

“हे ३ पदार्थ म्हणजे ३ माणसं आहेत असं समज. गरम पाणी हे त्यांचे problems आहेत. प्रत्येक जण problem ला सामोरा गेल्यावर वेगवेगळा react झाला.”

“त्यात काय... प्रत्येक गोष्ट शिजली.”

“तसं नाही... अगं थोड्या वेगळ्या नजरेतून बघ.”

“म्हणजे?”

“बटाटे बाजारातून आले तेव्हा चांगले कडक होते.. अर्थात strong होते असं म्हणूया. पण पाण्यात शिरल्यावर म्हणजेच problem ला सामोरं गेल्यावर लेचेपेचे म्हणजेच weak झाले. अंडी वेगळीच वागली. आधी आवरणाच्या आत liquid होतं. problem ला सामोरं जाताच ते घट्ट झालं. थोडक्यात ते स्वभावाने rigid झालं असं म्हणू. coffee ने मात्र problem ला संधी मानलं. बाळा, तू ठरव यातलं तुला कोण व्हायचं आहे. problems ला सामोरं जायला ही coffee शिकवते बघ. problems, problems आणि फक्त problems असं नुसतं म्हणून काही होत नाही. त्याला भिडलं की वाफाळत्या coffee सारखं best end  product मिळतं. ”

नातीने coffee चा वास घेतला नि आजीला म्हणाली, “हं... coffee best च आहे. पण आजी, हा प्रयोग कुठून शिकलीस?”

“अगं आपल्या शेजारी ते retired professor राहायला आले आहेत ना ते काल घरी आले होते तर मी त्यांच्यासाठी coffee केली होती.  त्यांना तो coffee चा सुगंध इतका आवडला आणि त्यांना अचानक त्यांच्या students ना सांगितलेली ही गोष्ट आठवली आणि मग त्यांनी ती मला सांगितली. त्यांनी तोंडी सांगितली आणि मी प्रात्यक्षिक करायचं ठरवलं.”

“कशाला?”

“तुला शिकवायला... होतील problems solve. आणि सगळे problems solve झाले तर राहतच काय मग... असो आणि कामात काम झालं ना माझं... आता नाश्त्याला ही उकडलेली अंडी आणि coffee. बटाटे उकडले म्हणजे दुपारच्या भाजीची पण सोय झाली बघ. फोडणी दिली की झालं.”

“पण coffee एक कपच केलीस आजी.”

“ती तू घे. कारण माझी coffee आज retired professor कडे आहे.”

“आं?”

 

-वरुण भागवत  

Comments

  1. I like coffee ....☕
    Coffee cha ghot pitanacha tu lihilela blog vachala...,
    Vachlynantar ,
    coffee LA☕
    Ajuncha Mazya Javal aanlas.. 🙋
    Thank you once again Varun.... 😍😍🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...